घाटंजी बजरंग दलाने दिले जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन
घाटंजी पोलीसांच्या दोन कारवाईने छुप्या गोवंश कत्तल व मांस विक्रीचा झाला भांडाफोड.
गोवंश कत्तल व मास विक्री कायम बंद करण्याची बजरंग दल व विश्व हिंदू दलाची मागणी
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
गेल्या काही महिन्यांत घाटंजी पोलिस ठाण्या अतंर्गत येणाऱ्या घाटी येथील गुरूदेव वार्ड येथे छूप्या पध्दतीने चाललेल्या गोमांस विक्री व कत्तलखाना वर चक्क दोन महिन्यांत दोनदा धाडी टाकून पुराव्यासह आरोपींताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई व घटने बद्दल घाटंजी पोलीस ठाण्यात गोमांस विक्री व कत्तल बाबत विविध प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात घाटंजी पोलीसांनी फिर्यादी राहुल प्रभाकर मस्के (वय 26) यांच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 429, 504, 506, 34 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 अंतर्गत सह कलम 53, 5ब, 5क अंतर्गत गुन्हे नोंदविले होते. वास्तविक पाहता एकाच ठिकाणी काही व्यग्तीचा गोमांस कत्तल विक्रीसी पून्हा समंध हे योगायोग नसून केवळ कत्तलीचा धंदा हे उघड झाले. या विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गोवंश कत्तल व मांसविक्री वर दोन ते तीन गुन्हे दाखल आहे.सदर घटना पोलीस दप्तरी नोंद असून या गोऊ कत्तलखाना विरोधी पोलीसांच्या धाडसी व निर्भिड कार्यवाही चे सर्व गोप्रेमी नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले परंतु सदर बाब आरोपीच्या एका बातमीदारास खटकली. आपले गोरख धंदे पोलिसांनी उघड केले या कार्यवाही मुळे आपली ही नामुष्की होते ही सत्य कार्यवाही या नातेवाईकांला जिव्हारी लागल्याने चिडून त्याने आकक्षा पोटी घाटंजी गोहत्या आळा घालण्यासाठी चालवलेल्या धडक कार्यवाही बदल पोलिस प्रशासनाला वेठीस धरण्याच्या प्रयत्न करत या उद्देशाने घाटंजी येथील ठाणेदार यांच्या विरोधात प्रकरणात उडी घेत प्रकरण सारवासारव करण्याचे हेतूने चक्क मुंबई गाठून तक्रारी करत वरिष्ठांकडे व विविध विभाग कडे तक्रार देण्याचा खटाटोप केला. दीलेली सदर तक्रार ही सोशलमिडियावर व्हायरल करीत पोलिस प्रशासनावर दबाव आणुन ‘आपलं ते बाब्या दूसऱ्याच ते कार्ट’ हा प्रयत्न अद्याप सूरु आहे.
सोशल मीडिया वर घाटंजी ठाणेदार व पोलिस स्टेशन यांचे विरूद्ध तक्रार ही व्हायरल पोस्ट बघून वि.ह.प. व बजरंग दल व हिंदू धर्मातील लोकांनी आता ही केलेली तक्रार खोटी असल्याचे वास्तव बघून ठाणेदार निलेश सूरडकर साहेब व पोलिस स्टेशन घाटंजी यांची सत्यबाजु घेत घाटंजी शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या व बंजरंग दलाच्या तरूणांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे गोहत्या कायम स्वरुपी बंद व्हावी आणि होणाऱ्या धडक गोहत्या मांसविक्री कार्यवाही मूळे पिसाळून हेतुपुरस्सर आरोपींच्या नातेवाईक कडून घाटंजी ठाणेदार विरूद्ध तक्रार दाखल केल्या जात असल्याचे निवेदन देतांना पष्ट केले. अशा बोगस व बिनबुडाचे तक्रारीवरून कर्तव्यात दक्ष व निर्भिड ठाणेदार व पोलिस सहकारी यांचेवर कुठलीही कार्यवाही केली जाऊ नये आणि आरोपि व गून्हेगार वृत्तीस प्रोत्साहन देऊ नये अशी मागणी सांस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदन सादर करताना कार्यकर्त्यांनी एक लेखी तक्रार दाखल करुन घाटंजी येथील गोवंश हत्या प्रकरणी आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात बजरंग दलाचे प्रमुख संयोजक राहुल गायकवाड ,सह संयोजक राहुल मस्के, विजय चव्हाण, प्रेम ऊदार, निखिल टेकाम,संकेत दोणाडकर,उज्वल धात्रक,बाला पेंदोर सह अन्य उपस्थित होते.
सदर गोहत्या प्रकरणात आरोपीताच्या बाजीने मत मांडून आरोपींच्या नातेवाईक कडून प्रकरण सारवासारव करण्याचे सुरु असून घाटंजी पोलीस विभागाला वेठीवर धरुन दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्यास जात आहे पण,या दडपशाहीच्या भिकेला कर्तव्यात कसूर न ठेवता गौकत्तल व मांसविक्री किंवा लपून जपुन समाजात वावरतांन पांढरा बुरखा घालत अवैध्य धंदे चालवणारे यांची गय केल्या जाणार नाही.पोलिसी कायद्यान्वये कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी सदेव तत्परतेनी कार्य करेल शिवाय कुणाला गुप्त माहिती देऊन अवैध्य धंदेचालवणारे,गोहत्या ,गोमास विक्री ईतर अवैध्य धंदे बदल माहिती द्यायची असल्यास द्यावी व पोलिसास सहकार्य करावे त्यांची माहिती नाव पुढे न येता गुप्त ठेवल्या जाईल.
निलेश सुरडकर घाटंजी ठाणेदार