हटके

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हण ठरली खरी 

Spread the love

              सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर, काही बोधात्मक, काही भयानक तर काही सस्पेन्स ची असतात. आपण ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ‘ही म्हण ऐकली असेल . ती म्हण जंगलात घडलेल्या घटनेने खरी ठरली आहे. .

प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडत असतं . वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

बिबट्या, हरीण, तरस आणि मगर यांच्या लढाईचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओध्ये तुम्ही पाहू शकता, हे सगळेच प्राणी एकापेक्षा एक आहेत. यातल्या प्रत्येकाचंच वेगळं अस्तित्व आहे. हरीण चपळ आहे तर बिबट्याचीही चपळतेबरोबर आक्रमकता आपण पाहिली आहे. मगरही विशाल आहे तर तरस हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. आता हे चौघे आमने-सामने आल्यावर शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा.

हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेली क्रूगर नॅशनल पार्कमधला आहे. बिबट्यानं चपळ हरणाला आपल्या तावडीत पकडल्याचं दिसत आहे. मात्र पुढच्याच क्षणी तरसांच्या टोळीने ही शिकार बिबट्याकडून हिसकावू घेतली. मात्र या दोघांच्या लढाईत लाभ मात्र तिसऱ्याचा झाला. हरीण तरसांच्या तावडीतही सापडलं नाही. मात्र शेवटी मगरीनं हरणाची शिकार करत ही लढाई जिंकली.

हा व्हिडीओ @Latestsightings नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close