शे.घाट येथील सह्हायक अभियंता विनायक वाडवे यांची बदली
वरूड/तूषार अकर्ते
शेंदूरजनाघाट शहराध्ये गेल्या ७ वर्षांपासून वीज वितरण केंद्राचे काम पाहणारे कर्तव्यदक्ष सहाय्यक अभियंता विनायक लक्ष्मन वाडवे यांनी वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा २४ तास सुरळीत राहावा यासाठी कशाचीही परवा न करता दिवसरात्र प्रयत्न केले आहे. कशाचीही पर्वा न करता धडपड करणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली असून शे.घाट मधील ग्राहकांच्या अडचणी प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेतलेला आहे.
मागील ७ वर्षाच्या कालावधीत शें.घाट शहर वासियांना सेवा देणारे मनमिळाऊ सहाय्यक अभियंता वाडवे यांची वरूड येथे नुकतीच बदली झाली आहे. त्यांनी या कालावधीत येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत प्रत्येकाची मने जिंकली आहे. त्यांनी सर्व ग्राहकांच्या तसेच कर्मचा-यांच्या अडचणी वेळोवेळी समजून घेवुन प्रत्येकाला सहकार्य केले आहे.
आपले कार्य पार पाडत असताना शहरातील सर्व विद्युत ग्राहकांनी मला साथ दिली व मला सांभाळून घेतले त्या बद्दल मी शहरातील नागरिकांचा सदैव ऋणी राहील असे प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. तसेच येथील नागरिकांनी मला वेळोवेळी दिलेली साथ मी कधीच विसरू शकणार नाही व सर्व ग्राहक व शेघाट शहर, ग्रामीण वि.केंद्रातील कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहका-या मुळेच आपण ग्राहकाभिमुख सेवा देण्यात यशस्वी झालो आहे हे कधीही विसरून चालणार नाही. यानंतर कधी येथील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली तर नक्कीच परत आपल्या सेवेत हजर होईल.येथील नागरिकांकडुन मिळालेले प्रेम यापुढेही असेच कायम राहील अशी आशा बाळगतो व अतिशय जड अंत:करणाने आपली रजा घेतो अशा भावना त्यांनी आपल्या वाणीतुन व्यक्त करत त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला आहे.
या मुळे त्यांचे ग्रांहकाप्रती व कर्मचा-याप्रती असणारे प्रेम परत एकदा दिसुन आले आहे.