हरदोली गावात बिबट्याची दहशत वासरावर हल्ला करून केले ठार ….

आर्वी / प्रतिनिधी
आर्वी जवळ असलेल्या हरदोली गावामध्ये गोठ्यात बांधून असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून
शिकार केल्याची घटना घडल्याने हरदो ली भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मिळालेल्या माहितीप्रमाणे शेतकरी शरद गणेश पोहेकर राहणार बाजार वाडा यांची हरदोली परिसरात शेती आहे
त्यांनी या शेतात नेहमीप्रमाणे आपले गुरुढोरे बांधून ठेवले मात्र मध्यरात्री बिबट्याने तारेच्या कंपाऊंड तोडून दरवाजा तोडून गोठ्यात प्रवेश केला गाय आणि वासरावर हल्ला केला या हल्ल्यात वासरू मरण पावले
सकाळी शेतात येताच शेतकरी शरद पोहेकार याना ही बाब दिसली तसेच घटना सकाळी माहिती होताच वन विभागाला याची माहिती देण्यात आली वन विभागाने पंचनामा केला असल्याची माहिती देण्यात आली
मागील काही दिवसापासून बिबट्याच्या भीतीने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी पशुपालक यांनी केली आहे
__________________