सामाजिक

छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात मतदार संघातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभागी व्हावे:- आमदार राजेंद्र पाटणी

Spread the love

कारंजा / अक्षय लोटे

दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कारंजा येथे आयोजीत छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेंद्र पाटणी यांनी केले आहे. आमदार मा.श्री.राजेंद्र पाटणी यांना या संदर्भात पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता , महिला व बालविकास मंत्री मा. श्री. ना. मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात सांगीतले की,छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर दि. ५ मे (बुध्द पोर्णिमा) ते ६ जून (शिवराज्याभिषेक दिन) २०२३ या कालावधीमध्ये आपण प्रत्येक विधानसभा करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करणार आहोत. त्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा विभागामार्फत पूरविण्यात येणार आहेत. आपण सक्रिय प्रतिसाद दिल्यास गरजू विद्यार्थ्यांना याठिकाणी बोलावून हा कार्यक्रम यशस्वी करु शकता. मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे, आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली स्थापित सरकार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास विभागांमार्फत नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात येत आहे. या योजना यशस्वी करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले होते.
आमदार राजेंद्र पाटणी यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवत कारंजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा रोड,कारंजा येथील शिबिराची तारीख निश्चित केली. प्रभारी प्राचार्य भालेराव यांचेसी चर्चा करून नियोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हारोड, कारंजा येथे सकाळी १० वाजता आयोजीत शिबिरात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मतदार संघातील सर्व ईतर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींना आमदार पाटणी यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगीतले.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close