अपघात
अगर ऐसा है तो गढ्ढे अच्छे है

ज्या घरात चालली होती अंत्य संस्काराची तयारी तेथे पसरला आनंद
लखनऊ / विशेष प्रतिनिधी
आपल्या नेहमीच वाचनात येत असते की अमुक एका रस्त्यावर खड्ड्यांमुळे टमुक टमुक व्यक्तीचा जीव गेला. पण कोणाला खड्ड्यामुळे जीवनदान मिळाले असे तुम्ही आयुष्यांत ऐकले नसेल. परंतु अशी घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले होते.ती व्यक्ती खड्ड्यामुळे जिवंत आपल्या कुटुंबात पोहचली.
जिल्हा न्यायालयात कर्तव्यावर असलेल्या विनिता शुक्ला यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना बरेलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. विनिता यांना लावण्यात आलेला व्हेटिंलेटर काढून त्यांच्या कुटुंबियांना त्यांना घरी नेण्याच्या सूचना केल्या. यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरु केली. विनिता यांना रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात येत असताना वाटेत चमत्कार घडला आणि विनिता यांना जणू पुनर्जन्म मिळाला. सध्या या घटनेची संपूर्ण पंचक्रोशीत सुरु आहे.
घटना उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात घडली आहे. विनिता शुक्ला यांना रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात येत होतं. तेव्हा हाफिजगंज मार्गावर त्यांची रुग्णवाहिकेचं चाक एका खड्ड्यात जोरात आपटलं. तेव्हा जवळपास गतप्राण झालेल्या विनिता यांच्या शरीरात हालचाल सुरु झाली. त्यांचे पती कुलदीप शुक्ला आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीनं पिलिभीतमधील खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरु केले. यानंतर विनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
विनिता यांची परिस्थिती बरेलीतील डॉक्टरांनी हात वर केले होते. व्हेंटिलेटर काढल्यावर सर्व संपेल, असं डॉक्टरांनी पती कुलदीप शर्मांना सांगितलं होतं. यानंतर कुलदीप यांनी काळजावर दगड ठेवून याची माहिती पिलिभीतमध्ये असलेल्या कुटुंबियांना दिली. त्यामुळे मुलगा, सून आणि लेकीवर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबियांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरु केली.
कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी विनिता यांच्या पार्थिवाची वाट पाहात होते. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. खड्ड्यामुळे रुग्णवाहिकाला जोरदार झटका बसला आणि विनिता यांना संजीवनी मिळाली. दुसरीकडे पिलिभीतमध्ये विनिता यांच्यावर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. राकेश सिंह यांचीही चर्चा आहे. रुग्णामध्ये सर्पदंश झाल्याची लक्षणं दिसून आल्यानं अँटी व्हेनम इंजेक्शन आणि आवश्यक औषधं दिल्याचं सिंह यांनी सांगितलं. यानंतर २४ तासांत विनिता यांची प्रकृती सुधारली. लखनऊमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणि १३ दिवसांच्या उपचारांनंतर विनिता आता पूर्णपणे तंदुरुस्त असून आपल्या घरी परतल्या आहेत.




