शिकवण्याचे सोडुन तो महिला शिक्षिकेसोबत करत होता तसले कृत्य
पत्नीनेच केला त्याच्या कृत्याचा भांडाफोड
बीड / नवप्रहार मीडिया
येथील मिलिया माध्यमिक शाळेत शिक्षक असलेल्या एका शिक्षकाने पेस्याला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. याने मुलांना शिकवण्याचे सोडुन महिला शिक्षके सोबत अश्लील व्हिडीओ बनवले आहेत. मुख्य म्हणजे त्याच्या पत्नीनेच याचा भांडाफोड केला आहे. आमेर काझी असे त्या आंबटशौकीन शिक्षकाचे नाव आहे. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेत हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी आमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नराधाम आमेर काझीच्या या सर्व प्रकरणाचा त्याच्याच बायकोने भांडाफोड केला आहे.
आमेर काझी हा बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून तो, त्याच शाळेत अश्लील व्हिडिओ बनवत होता. धक्कादायक म्हणजे अमीर हा शाळेतील महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवत होता. आमेरच्या पहिल्या पत्नीने त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. आमेर काझीने गेल्या वर्षभरापासून शाळेतील महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सुरवात केली होती. धक्कादायक म्हणजे आरोपी काझीने आपल्या दुसऱ्या पत्नीचाही असाच अश्लील व्हिडिओ बनवला असल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, याच काळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काझीचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
आमेर काझीच्या दुसऱ्या बायकोच्या माध्यमातून हे सर्व प्रकरण समोर आले आहे. तसेच, या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल देखील झाला आहे. विशेष म्हणजे माध्यमांमध्ये या घटनेच्या बातम्या आल्यानंतर शाळा प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला. त्यामुळे या प्रकरणात शाळा प्रशासनाने आरोपी काजीला वाचवण्याचा प्रयत्न केला का?, सुरुवातीलाच शाळा प्रशासनाने थेट भूमिका का घेतली नाही? असे प्रश्न पालक विचारत आहे.
उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
शाळेला शिक्षणाचं मंदिर समजलं जाते. मात्र, शिक्षकच असे वागत असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील, या विचाराने अनेक पालक दस्तावले आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांनी या शाळेतून आपल्या मुलांची टीसी काढून घेतली आहे. तर, काही पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर, मुलांना शिकवण्याचं सोडून आमेर काझी अश्लील व्हिडिओ बनवत होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तर, या घटनेची आज महाराष्ट्रभर चर्चा आहे. त्यामुळे आज आमची मान शर्मिने खाली गेली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे अशीही मागणी पालक करत आहे.
शाळेची प्रतिमा मलीन
बीड जिल्ह्यात मिलिया महाविद्यालयाचे नाव मोठं आहे. मात्र आमेर काझी सारख्या शिक्षकामुळे, शाळेची प्रतिमा मलीन झाली आहे. आता या सर्व प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे. कुणाच्या आशीर्वादाने अमीर काझी हे सर्व प्रकार करत होता. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहे. यातून काय समोर येणार आणि आमेर काझीवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.