मुलांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सप्रे कुटुंबियांचे साखळी उपोषण
यवतमाळ वार्ता / अरविंद वानखडे
दिनांक2, जानेवारी 2024 यवतमाळ येथील पोस्टर ग्राउंड समोर शरद रघुनाथराव सप्रे. व त्यांची पत्नी मुलाला मरणोत्तर न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपोषणाला बसलेले आहे. सविस्तर वृत्त असे दिनांक 28 मे 2024 रोजी तूप टाकळी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे दोन मोटर सायकलची परस्परांना धडक लागल्याने अपघात झाला होता. त्या अपघाताचे शाब्दिक वाद झाल्याने घर अर्जदार श्री संजय शेडगे यांनी यांचे नातेवाईक त्या ठिकाणी बोलावून शरद रघुनाथ सप्रे यांचा दत्तक दिलेला मुलगा नामे परेश देविदास भोरे याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली व त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपा चा मार लागल्याने तो कोमामध्ये गेला व नंतर त्याचे मेडिकल कॉलेज नागपूर येथे निधन झाले.
यावर सप्रे कुटुंबीयांनी दिग्रस पोलीस स्टेशनला श्री संजय शेडगे यांच्या नातेवाईकासह पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार केली. 2023 पासून ते आजवर अनेकदा पोलीस अधीक्षक व दिग्रस येथील ठाणेदार यांना निवेदन देऊन अद्याप पर्यंत न्याय न मिळाल्याने आज दिनांक दोन जानेवारी पासून सप्रे कुटुंबीय साखळी उपोषणाकरिता बसले आहेत.