अस्थ्याही चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोडमली.

यवतमाळ –येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसंतराव नाईक रुग्णालय येथे २९ दिवसीय चतुर्थश्रेणीतील कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असून अद्यापही त्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्याचे आदेश शासनाकडून मिळाले नसल्याकारणाने जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करीत नाही. तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घ्यायच्या नसल्याचा पवित्रा चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी यांनी घेतला असून याचा फटका रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार १८० दिवस काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आदेश असताना सुद्धा २९ वर्षापासून काम करत असणाऱ्या असंघटित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अद्यापही सामावून घेण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाच्या वैद्यकीय सचिव याना निवेदन दिले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुदाम देऊळकर यांनी आंदोलन स्थळी पत्रकारांना दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय मध्ये ७४ बदली कर्मचारी गेल्या २९ वर्षापासून काम करीत आहे. तसेच ज्या स्थाही जागेवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्या सर्व जागा आत्तापर्यंत रिक्त असून त्याच पदावर त्यांना कायमस्वरूपी सामावून घेणे अपेक्षित असताना या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरती एक प्रकारे अन्याय केल्या जात आहे. यासंदर्भात संघटनेने न्यायालयीन अचिका सुद्धा दाखल केली असून या याचिकेवर न्यायालयाने कर्मचारी संघटनेच्या बाजूने निकाल दिला असताना सुद्धा अद्यापही वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालय प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले नाही.
यासंदर्भात अनेकदा कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले निवेदन दिले मात्र याबाबत शासनाने आणि रुग्णालय प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही. २९ वर्षे सेवा केल्यानंतर जर कायमस्वरूपी आदेश मिळत नसेल तर आम्ही १ डिसेंबर २३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देऊन संप सुरू केला आहे. दरम्यान चतुर्थीश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथील आवश्यक सेवा कोडमाली आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ याबाबत निर्णय घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.सर्व कर्मचाऱ्यांनी या मागणी करिता वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन सुरू आहे .