क्राइम

भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री कडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालाला अटक 

Spread the love

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालाला  पिंपरी चिंचवड पोलीस विभागाच्या मानवी  वाहतूक प्रतिबंधक विभागा कडून अटक करण्यात आली असून अभिनेत्री आणि मॉडेलिंग करणाऱ्या अन्य एका तरुनीची सुटका करण्यात आली आहे. 

                   शहरातील मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली होती की काही तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पंचतारांकित हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय करवून घेतल्या जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. 

पैशाचे अमिश दाखवून भोजपुरी फिल्म अभिनेत्री व मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसायात ओढन्यात येऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर  पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून प्रथम खात्री करून घेतली. आणि  त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला

पंचतारांकित हॉटेलमध्ये संबंधित तरुणींना बोलून ग्राहक पाठवून दलाल वेश्याव्यवसाय म्हणजे सेक्स रॅकेट चालवायचा. याबाबत पिंपरी- चिंचवडच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळाली. संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका केली असून दलाला पोलिसांनी अटक केली आहे. पैकी एक भोजपुरी फिल्म मधील अभिनेत्री असल्याचे समोर आलं असून दुसरी तरुणी मॉडलिंग करत असल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्र आणि सेक्स रॅकेट असं नातं उघड झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close