शाशकीय

उपविभागीय पोलीस अधिकारी चमू ची जबरदस्त कारवाई  अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त

Spread the love

02 ट्रक व 22 गोवंशीय जनावरांसह एकुण 21,54,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

गडचिरोली / तिलोत्तमा हाजरा

गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिनांक 06/10/2023 रोजी मौजा आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपणीय बातमीदारांकडु न मिळालेल्या माहितीच्या आधारे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखे डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज राऊत असे पोस्टे कुरखेडा हद्दीतील आंधळी गावासमोर थांबले असता, थोड्या वेळात नमुद संशयित वाहन येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना हात दाखवुन थांबविले असता, दुरुनच पोलीसांना पाहुन वाहन चालक वाहन सोडुन पळून गेले. त्यानंतर मालवाहु वाहनाजवळ जावुन बघीतले असता, सदरचे मालवाहु वाहन हे एकुण 02 मालवाहु ट्रक असल्याचे दिसुन आल्याने वाहनामध्ये काय आहे ? याबाबत तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर मालवाहू ट्रक क्र. एम एच-40-सी डी-1545 व एम एच-34-ए बी-9001 या दोन्ही वाहनामध्ये एकुण 22 गोवंश अंदाजे किंमत प्रत्येकी 7,000/- रुपये प्रमाणे एकुण किंमत 1,54,000/- रुपये व दोन मालवाहू ट्रक अंदाजे किंमत प्रत्येकी 10,00,000/- रुपये प्रमाणे एकुण 20,00,000/- असा एकुण 21,54,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहिल झरकर सा. यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. तिलोत्तमा समर हाजरा गडचिरोली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close