विदेश

उतार वयात तीन केलं अस काही की गमवावा लागला जीव

Spread the love

लंडन / नवप्रहार डेस्क

                    सुंदर दिसण्याची ईच्छा संगळ्यांनाच असते. सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असतो. मुख्यतः महिलांमध्ये सुंदर दिसण्याचे क्रेझ जरा जास्तच असते. त्यासाठी त्या ब्युटीपार्लर , स्पा या सारख्या गोष्टींची मदत घेतात .काही वेळा महिला तरुण दिसण्यासाठी शस्त्रक्रिया देखील करून घेतात.  युकेत एका आठ नातवंडांची आजी असलेल्या महिलेला जवाणीचा असा जोश चढला की त्यात तिचा ज8व गेला.

कॅरोल कीनन असं या मृत महिलेचं नाव आहे. कॅरोल 8 नातवंडांची आजी होती. तिचं आयुष्य अगदी सुंदर सुरू होतं, पण अचानक तिला तरुण दिसावंसं वाटू लागलं. तिने ताबडतोब तुर्कस्तानचं तिकीट बुक केलं.

तरुण दिसण्यासाठी ती तिथं शस्त्रक्रिया करायला केली. पण आपली ही हौस आपल्या जीवावर बेतेल याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तिने टमी टक आणि ब्राझिलियन बम लिफ्ट सर्जरी करून घेतली. त्यानंतर इस्तांनबुलमधून तिने स्नायूंची तिसरी शस्त्रक्रियाही करवून घेतली होती. शस्त्रक्रियेनंतर कॅरोलला अचानक पोटात आग लागल्यासारखं जाणवू लागल्याचं तिच्या मुलीने सांगितलं. यानंतर तिचा जीव गेला.  कॅरलची मुलगी लिओनी म्हणाली, तिला कल्पना नव्हती की तिची आई ही धोकादायक शस्त्रक्रिया करणार आहे. त्यामागचा धोका सर्वांनाच माहीत नव्हता.

ही शस्त्रक्रिया करून कॅरोल खूश असेल तर तिच्या आनंदात सगळेच खूश आहेत, असं सर्वांना वाटले. त्यामुळे तिला कुणीही अडवलं नाही. मात्र, आता कॅरोलच्या मुलीला याचा पश्चाताप होत आहे. वयाच्या 54 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.एप्रिल, 2022 मध्ये तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर तिच्या कुटुंबाने याबाबत सर्वांना सांगितलं आणि लोकांना अशा शस्त्रक्रियेबाबत जागरूक केलं आहे.

सुंदर दिसण्याच्या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम तज्ज्ञांच्या मते, गुंतागुतीशिवाय कोणतीही सर्जरी होत नाही. सर्जरीचं यश किंवा अपयश हे सर्जनच्या कौशल्यावर अवलंबून असतं.त्यांना संबंधित धोके कमी करावे लागतात. इतर कोणत्याही सर्जरीप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरीमध्येदेखील गुंतागुंत होऊ शकते. फेसलिफ्ट सर्जरीनंतर पेशंटला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, असं अनेक संशोधनांमध्ये दिसून आलं आहे; मात्र प्लास्टिक सर्जरीमुळे काही परिणाम होऊ शकतात.

लिपोसक्शन सर्जरीमध्ये मांड्या आणि ओटीपोटातली चरबी काढून टाकतात. त्यानंतर, वजन वाढलं तर पेशींची असमान वाढ होण्याचा धोका असतो. इतर गुंतागुंतींमध्ये हिमॅटोमाचा  समावेश होतो. ही एक मोठी वेदनादायक जखम असते. ती रक्ताच्या पॉकेटप्रमाणे दिसते. ब्रेस्ट सर्जरीच्या एक ते सहा टक्के प्रकरणांमध्ये ही समस्या उद्भवते.  सर्व शस्त्रक्रियांमध्ये संसर्ग ही सर्वसामान्य गुंतागुंत आहे.

सुमारे दोन ते चार टक्के जणांना याचा सामना करावा लागू शकतो. स्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर सेल्युलायटिसची गुंतागुंत होऊ शकते. इतर काही गंभीर गुंतागुंतीदेखील उद्भवतात. प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर रुग्णाच्या शरीराला मुंग्या येणं आणि बधिरपणा जाणवू शकतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close