मी त्यांची अंडीपिल्ली काढू शकतो पण .. वाचा कोण म्हणाले असे
मुंबई / नवप्रहार डेस्क
राजपुत्र अमित ठाकरे माहीम मधून निवडणूक लढवीत आहेत. या मतदार संघात महायुती कडून सदा सरवणकर रिंगणात आहेत. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेक प्रयन्त झाले .सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. पण राज यांनी भेट नाकारली . त्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय घेतला.
राज ठाकरेंनी प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेतली. यासभेत अमित यांच्या विरोधात उभे असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर नाव न घेता राज ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.
‘अमितच्या विरोधात जी लोकं उभी आहेत त्यांची सगळी अंडीपिल्ली काढू शकतो पण त्या घाणीत मला हात नाही घालायचा. जो कोणाचा झाली नाही त्याच्या बद्दल आपण काय बोलायचं. बाळासाहेब हयात असताना ती व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. आमदारकीला उभी राहिली. तिथं पडली मग परत शिवसेनेत आली. शिवसेनेत निवडणूक लढून जिंकून आली. मग एकनाथ शिंदेंचे बंड झालं तेव्हा त्यांना पेट्रोलपंपावर शिव्या दिल्या आणि संध्याकाळी परत एकनाथ शिंदेंसोबत जाऊन बसले.’, असे टोला सदा सरवणकर यांचे नाव न घेता राज ठाकरेंनी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांचे देखील नाव न घेता राज ठाकरेंनी टीका केली. राज म्हणाले, ती दुसरी व्यक्ती ही यांच्यासोबत उभी आहे. ती देखील बाळासाहेब आहात असताना काँग्रेसमध्ये गेली. त्यांच्याकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढली.
लोकसभेला बिनशर्त पाठींबा देत असताना अमित उभा राहणारे हे माझ्या मनात देखील आलं नव्हतं. त्यामुळे तो विषयच नव्हता. मी फक्त येवढ्यच सांगितलं तुम्हाला काय करायचे ते करा.अमितला निवडून नक्की आणणार.अमितसाठी माझी ही एकच सभा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
मी ठरवलं होत कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे 2006 ला शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा पक्ष काढला. माझी महाराष्ट्रासाठी अनेक स्वप्न आहेत. मला महाराष्ट्र वेगळा घडवायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.