सामाजिक

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे योग दिवस साजरा

Spread the love

 

हिवरखेड / प्रतिनिधी

स्थानिक हिवरखेड येथील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या योग दिनामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला सहभाग घेतला होता या कार्यक्रमांमध्ये क्रीडा शिक्षक जगदीश वडाळकर सर यांनी वेगवेगळे योग विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व चैतन्य खारोडे सर यांनी समजावून सांगितले आणि त्यानंतर वडाळकर सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.विद्यार्थ्यांनी साजरा केलेल्या योग दिनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीतजी लखोटिया सर, संस्थेचे उपाध्यक्ष लुणकरनजी डागा सर तसेच संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर, शारदा लखोटिया मॅडम, रेखा चांडक मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close