क्राइम

प्रियकराच्या मदतीने पतीचा ‘ दृश्यम ‘ स्टाईल मर्डर 

Spread the love

सहा महिन्यांनंतर हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश 

अशोकनगर ( मध्यप्रदेश) / नवप्रहार मीडिया 

                  प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सहा महिन्यांनापूर्वी घडलेल्या या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पकडल्या गेल्यास पोलिसांच्या तपासणीत अडकू नये म्हणून या दोघांनी ‘ दृश्यम ‘ हा चित्रपट वारंवार पहिला असल्याची कबुली दिली आहे.

                 पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  अशोक नगर येथील रहिवासी सौरभ जैन याचे लग्न ऋचा जैन नावाच्या मुलीसोबत आठ वर्षांपूर्वी झाले होते. दरम्यान ऋचा हिचे दिनेश भार्गव नावाच्या तरुणांशी सूत जुळले. त्यात सौरभ अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला.

 शहरातील सौरभ जैन हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची हत्या झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत होता. त्याच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. 13 जुलैपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांनी सौरभरचा कसून शोध घेत होती. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी सगळ्यात पहिले सौरभची पत्नी आणि तिच्यासोबत राहत असलेल्या दीपेश भार्गवला ताब्यात घेतले. त्या दोघांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली.

सौरभ जैनच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सौरभचे लग्न आठ वर्षांपूर्वी ऋचा जैनसोबत झाले होते. त्याचदरम्यान ऋचा जैन आणि दिपेश भार्गव यांच्यात अफेअर सुरू झाले. त्यानंतर प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. 23 फेब्रुवारी 2023 रोजी ऋचा आरोपी सौरभ जैन याच्यावर उपचारांचा बहाणा करुन त्याला बाहेरगावी घेऊन गेली.

विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद जवळ सौरभ जैनची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सौरभचा मृतदेह त्याच अवस्थेत टाकून दोघांनीही तिथून पळ काढला. शमशाबाद पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात तेव्हा तक्रार दाखल केली होती. मात्र, 6 महिन्यांनंतर मयत तरुणाच्या भावाने तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार ऋचा जैन आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीच सौरभची हत्या केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्ष बदलण्यासाठी आरोपी पत्नी आणि तिचा साथीदाराने वारंवार दृश्यम चित्रपट पाहिला होता. त्यामुळं जेव्हा पोलिस त्यांची चौकशी करत होतो तेव्हा वेगवेगळ्या कहाण्या रचून पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्याच जाळ्यात त्यांना अकडकवून हत्येची माहिती काढली आहे.

मयत सौरभच्या एटीएममधून काढत होते पैसे

शमशाबादमध्ये पतीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभच्या एटीएममधून सतत पैसे काढून मज्जा करत होते. मृत्यूच्या काही दिवस आगोदरच सौरभने त्याची पाच एकर जमीन विकली होती. त्याचे 11.50 लाख रुपये आले होते. ते पैसे पत्नीकडेच होते. त्याचदरम्यान त्यांनी एक ट्रॅक्टरदेखील खरेदी केले होते. ते एका ठिकाणी भाड्याने चालवायला दिले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close