सामाजिक

शेतकरी ,शेतमजूर, विधवा महिलांच्या, मागण्या करिता सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात रामटेक तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा

Spread the love

नागपूर( प्रतिनिधी) -विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांचे नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयावर दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ला विशाल मोर्चा काढण्यात आला .काढण्यात आलेल्या प्रमुख मोर्चाच्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती करण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकरी, शेतमजू,र निराधार, श्रावणबाळ विधवा महिला, दिव्यांग यांना किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत सन 1994 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मासिक महिना 6000 रुपये देण्यात यावा, शेतकऱ्यांना 2006 मध्ये पारित झालेल्या स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा ,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावेत, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे वयाची अट 65 वरून 60 करण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्यात यावी ,महागाई ,पेट्रोल, डिझेल, यांच्या किमती कमी करण्यात यावे , भूमिहीन शेतमजुरांना पट्टे देण्यात यावेत व त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी ,शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये 25 टक्के आरक्षण देण्यात यावेत सिलेंडरच्या किमतीत घट करण्यात येऊन चारशे रुपयांना देण्यात येऊन महिलांचा सन्मान करण्यात यावा धानाला बोनस जाहीर करण्यात यावे, वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार रामटेक यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री , ऊर्जामंत्री व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले .वरील मागण्या मान्य न झाल्यास विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भीकमांगो आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी सर्वस्वी शासन व प्रशासनाची राहील. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे, उपाध्यक्ष नम्रता बागडे , सीमा सरनागत ,पौर्णिमा खांडेकर ,विजया बागडे ,सुनिता राऊत ,सुमित्रा देव्हारे ,चरण बर्वेकर ,गुलाब रंधवे, सुनील गईगये ,बाबुराव मोहारे, टीकाराम रहाटे ,निलेश बारस्क,र छाया कोकोडे ,जयश्री हटवार, सुनिता राऊत , पार्वता नेवारे ,पंचशीला पोचपोगडे ,श्यामकला सरनागत शिला सलामे, रामकला सरनागत ,स्वाती वासनिक व असंख्य कार्यकर्ते यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close