क्राइम

लव्ह ट्रँगल मध्ये सब इन्स्पेक्टर ला गमवावा लागला जीव 

Spread the love

राजगड ( मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क 

              पोलिस शिपाई असलेल्या पल्लवी सोलंकी हीचे करण ठाकूर यांच्या सोबत प्रेमसंबंध होते. आणि ते लिव्ह इन मध्ये राहत होते. मध्यंतरी त्यांच्यात कुठल्यातरी कारणाने बिनसले. त्यामुळे दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडले. यानंतर पल्लवी ची बदली देहात ठाण्यात झाली. त्यानंतर तिच्या जीवनात उपनिरीक्षक दीपांकर गौतम आले. आणि त्यांच्यात प्रेम निर्माण झाले.

                    दरम्यान पल्लवी च्या जीवनात पुन्हा करण ची एन्ट्री झाली. आणि विस्कटलेल्या प्रेमाला पालवी फुटली. ही बाब दिपाशंकर यांना माहिती झाल्यावर त्यांनी करण ला पल्लवी पासून दूर राहण्यास सांगितले. या धमकिने करण रागावला. त्यांनी दिपाशंकर याला संपवण्याचे ठरवले. पल्लवी आणि करण ने काहीतरी कारण सांगून त्यांना नॅशनल हायवे वर बोलावले.

           बोलणे आटपून जेव्हा दिपा शंकर बाईक वर बसून जायला निघाले तेव्हा पल्लवी आणि करण यांनी ते बसलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना मागून धडक दिली. आणि ३० मिटर पर्यंत फरफटत नेले. त्यात त्यांचा मृत्यु झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close