यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आजपासून दोन दिवस गृहमतदान
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार सघांतर्गत येत असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात दि.१८ व दि.१९ एप्रिल अशा दोन दिवशी वयोवृध्द व दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान घेण्यात येणार आहे. गृहमतदानासाठी अर्ज केलेल्या अशा मतदारांनी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वय वर्षे 85 वरील मतदार व दिव्यांग मतदारांच्या घरी जावून दिनांक 18 व 19 एप्रिल या दोन दिवसाच्या कालावधी वय वर्ष 85 वरील 190 मतदार व दिव्यांग 19 मतदारांच्या घरी जावून पोस्टल बँलेट पद्धतीने मतदान घेतले जाणार आहे. यासाठी एकुण 8 पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही पथके सलग दोन दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोस्टल बॅलेट पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.
ज्या वय वर्षे 85 वरील मतदार व दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नमुना 12 डी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत यवतमाळ येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे, अशा मतदारांनी अर्जात नमुद केलेल्या पत्यावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.