चोरांबा येथे घरगुती गॅस सिलिंडरला अचानक पेट
९० हजार रु रोख व घरगुती साहित्य जळून खाक सुदैवाने जीवितहानी टळली.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सविसस्तर वृत्त.
घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील श्री तूकाराम राऊत यांच्या घरी त्यांची म्हातारी पत्नी सौ. कलावतीबाई तुकाराम राऊत हिने आज दी. २१.१०.२०२३ ला सकाळी ८ चे सुमारास स्वयंपाक करण्यासाठी गॅस लावला असता गॅस सिलिंडर लीक असल्याने गॅसने अचानक पेंट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारन केले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी तुकाराम राऊत आणि कलावती राऊत या म्हातारी दाम्पत्य जीवनावषक साहीत यात जळून खाक झाले.आगीचे रुपाने काळाने होत्याचे नव्हते झाले. गॅसने इतका भयंकर पेट घेटला कि संपूर्ण रूममध्ये आगीची ज्वाला दिसत होती त्यामुळे घरातील महत्वाचे सामान आणि घरात ठेऊन असलेले रुपये घराबाहेर सुखरूप काढणं घरच्याना आणि प्रत्यक्ष दर्षी गावातील लोकांना शक्य झाले नाही.घरातील पूर्ण सामान सह घरात असलेले 90 हजार रुपये, गहू तांदूळ, किराणा सामान दिवाण,व त्यावरील गादी दरवाजे खिडक्या आणि महत्वाचे कागद पत्रे जसे आधार कार्ड,पॅन कार्ड,बँकेचे पासबुक, मतदान कार्ड गॅस सिलेंडरचे पुस्तक व पैसे पूर्ण जळून राख झाले.घरात आग लागल्या बरोबर उपस्थित बाईने आरडाओरडा केला असता गावातील लोकांनी घराकडे धाव घेत रुद्ररूप धारण केलील्या आगची खोलीतील आग विझवण्याचा प्रयत्न केला.आजूबाजूला असलेले पाणी तत्परतेनी आणून आग विझविण्यात गावकऱ्याना यश आलं परंतु घरातील सामान आणि घरात असलेले 90 हजार रुपये आगीत जाण्यापासून ते वाचवू शकले नाही.नुकसानग्रस्त दाम्पत्याला तीन मुल असून कलावती आणि तुकाराम हे दोन्ही म्हातारे दाम्पत्य मुलांपासून अलग राहत असल्याने त्यांची गॅस सिलिंडरच्या लिकमुळे जे नुकसान झाले आहे ते लखमाई इंडेन गॅस एजन्सी घाटंजी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना नुकसानग्रस्त महीला व उपस्थितांनी दीली. विशेष म्हणजे नुकसान ग्रस्त महीलेणी पतीला न कळत ४०,००० रु घरात पाई नपाई जमा करुन साठवुन डब्यात ठेवली होती आग लागली त्यांचे काही दिवस आधी नुकसान ग्रस्त घरातील महिलेच्या पतीने ही शेतीवर मध्यवर्ती बँक मधून पिक कर्ज उचलून आलेले ५०,००० रु घरी ठेवले होते तेही आगीत जळून खाक झाल्याचे धायमोकलून नुकसानग्रस्त महीला सांगत होती.