होलीफेथ स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात
हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड स्थानिक होलीफेथ इंग्लिश प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन 30 जानेवारी 2025 गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरे करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव स्नेहल भोपळे सर हे होते.तर संमेलनाचे उद्घाटक माजी जि. प .सदस्या सुलभाताई रमेश दुतोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील प्रकाश गावंडे, प्रमोद पोके केंद्रप्रमुख, डॉ रामदास धुळे, डॉ पायल धुळे, मनीष गिऱ्हे, सुनील अस्वार, अरुण राहणे,डॉ प्रशांत इंगळे, जिवनराव देशमुख आबासाहेब खेडकर शिक्षण संस्था व इंग्लिश प्राइमरी स्कूलचे अध्यक्ष तसेच निरीक्षक म्हणून कल्पना राऊत,उज्वला वानखडे उपस्थित होत्या. प्रेस क्लब अध्यक्ष सतीश इंगळे, गोवर्धन गावंडे, केशव कोरडे,मनोज भगत श्रीगजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे, धनंजय जाधव सर, ठाकूर सर,सागर ढ|करे ,खरोडे सर, तेलगोटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्याचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मुख्यद्यापिका सौ कल्पना सुनील अस्वार यांनी प्रास्ताविक केले. नर्सरी ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, कला ,वेशभूषा व नुत्य सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.सूत्र संचालन सीमा सोनोने , ,सिमा राहाटे , शितल शेळके मॅडम तर आभार प्रज्ञा गवई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम , सोनू ताई कुऱ्हाडे, शितल अग्रवाल, पूनम मानकर, राजारामभाऊ इंगळे सौ.ढेगेकर सौ. वायकर यांनी परिश्रम घेतले.