हटके

त्याचा दोन बायकांचा डाव फसला ……

Spread the love

जमुई (बिहार ) / नवप्रहार  डेस्क

              ‘ दोन बायका आणि फजिती ऐका ‘  ही म्हण आवली ऐकली असेल ओण या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव बिहार च्या जमुई येथील लोकांना आला आहे. एका मुलीचा बाप असलेल्या एका तरुणाला सोशल मीडियावर दुसऱ्या मुलीशी प्रेम झाले आणि त्यांनी दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यासाठी मुलगी घर सोडून त्याच्या सोबत पळून जाण्यास तयार झाली. पण ही बाब मुकी ह्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.आणि त्यानंतर घडले असे नाट्य

बिहारच्या झाझा येथील विनोद नावाच्या तरुणाला  दुसऱ्या पत्नीचा बेत आखणे महागात पडलं आहे. हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत भोपाळला निघाला होता, मात्र गर्लफ्रेंडच्या नातेवाईकांनी त्याला रेल्वे स्टेशनवर पकडलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.

मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस कारवाई करत आहेत. तरूण विवाहित असून त्याला दोन वर्षांची मुलगीही असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाझा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या विनोदची गेल्या वर्षी एका जत्रेत एका मुलीशी ओळख झाली. तेथून दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. दोघांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि संभाषण सुरू झाले. तरुणाने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. नुकताच विनोद भोपाळहून त्याच्या गावी आला होता. याच दरम्यान दोघांनी मिळून पळून जाण्याचा बेत आखला.

तरुणीने सांगितले की, विनोद विवाहित असल्याचे मला माहीत होते. असे विचारले असता विनोदने सांगितले की, सुरुवातीला काही महिने भोपाळमध्ये ठेवणार होता, नंतर बिहारला आणणार आणि दोन्ही पत्नींना सोबत ठेवणार होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. झाझा रेल्वे स्थानकातून दोघांना पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

विनोदने पोलिसांना सांगितले की, दोघेही एकमेकांना ओळखतात. तो म्हणाला की, मी भोपाळला गेल्याची बातमी ऐकून मुलगी स्वतः माझ्या मागे लागली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. यादरम्यान तरुणाची पत्नी आपल्या मुलीसह खैरा पोलीस ठाण्यात आली आणि पतीला सोडण्याची विनंती करत होती. काहीही झालं तरी चूक समजून माफ करा आणि नवऱ्याला सोडून द्या, अशी विनवणी पत्नी करत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close