आठवडी बाजार आर्वी येथे बैल पोळा माेठ्या उत्साहात साजरा
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : आठवडी बाजार येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा नगरपरिषद यांच्या हस्ते आठवडी बाजार आर्वी येथे उत्कृष्ट बैल जोड्या आणणाऱ्या शेतकरी राजांना सन्मानित करण्यात आले.
संकट येतील आणि जातील मात्र शेतकऱ्यांनी खचू नये आत्महत्या सारख्या गोष्टीचा विचार शेतकऱ्याने मनात आणू नये बैल पोळा आठवडी बाजार आर्वी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बैल जोड्या घेऊन येतात आणि त्यांना या ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ठ बैलजोडी घेवून येणाऱ्या शेतकऱ्याला येथे पुरस्कृत केले. यावेळी मुख्याधिकारी शिरसाट साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्याला रोख रक्कम आणि शाल श्री फळ देवून पुरस्कृत करण्यात आले. आठवडी बाजार येथे बैलजोड्या कमी आल्या होत्या त्याचीही खंत मुख्याधिकारी शिरसाट यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.
तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला.