सामाजिक

जवळा ग्रामपंचायत जनतेच्या हितासाठी सतर्क.

Spread the love

 

बस स्टँड वरील बाभळीचा डांगा पडला मनुष्याच्या शेजारी.

चांदुर रेल्वे (ता. प्र.) *प्रकाश रंगारी*

जवळा येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सचिव यांच्या सहकार्यामुळे धोकादायक असलेल्या बाभळीचे आज दिनांक 26 /07/24 शनिवार रोजी वरील भाग छाटून बाभळी पासून असलेली भीती नष्ट करण्यात आली .कित्येक दिवसाची असलेली बाभूळ ही धोकादायक असल्यामुळे लोकांना त्या बाभळीची भीती वाटायची. काही दिवसापूर्वी त्या बाभळीचा एक डांगा बसलेल्या लोकांच्या मागे पडला. त्यामुळे तिथे बसायची कोणी हिंमत करीत नव्हते. आणि वरील सर्व डांगे फडकले असल्यामुळे कधी खाली पडतील याचा नेम नव्हता. सरपंच,उपसरपंच आणि सचिव यांनी सतर्कता दाखवत
बाभळीला पूर्णपणे छाटून टाकले. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती आता नष्ट झालेली आहे. बाभुळी खाली आता लोक बिनधास्त बसत आहे. बाभळी खाली एक टीनाचा पानठेला आहे, वाटर सप्लाय ची एक रूम आहे. बाजूला इलेक्ट्रिक डीपी आहे. बाभळीच्या फांद्यामुळे मेन लाईनच्या तारांना सेंधून लाईन नेहमी जात होती. परंतु आता कसलीही भीती राहिलेली नाही. आणि कोणताही अपघात आता होणार नाही. हे सगळं सरपंच, उपसरपंच, सचिवाच्या सहकार्याने झालेला आहे. यांनी सतर्कता दाखविली नसती, तर केव्हाही, अपघात होऊ शकला असता. असे गावकरी मंडळीकडून बोलल्या जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close