क्राइम

 अरे बाबो ……! चोरट्यांनी लोखंड चोरण्या ऐवजी अख्खा पुलच नेला चोरून 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

वर्तमान पत्र किंवा वृत्त्ववाहिनीवर विहीर, शेत किंवा प्लॉट चोरीला गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात.मुख्य म्हणजे कागदावर त्या गोष्टी गहाळ झाल्याने अश्या अश्यायाच्या बातम्या प्रकाशित केल्या जातात . पण मुंबईत तोंडात बोटे टाकायला लावणारी घटना घडली आहे. येथे 90 फूट लांब आणि 6 हजार किलो वजनाचा पुलच चोरी करण्याचा प्रताप चोरांनी केला आहे. पोलिसांनी सुद्धा चोरावर मोर बनत या चोरांचा छडा लावला आहे.”

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत चोरट्यांनी 90 फूट लांब लोखंडी पूल चोरून नेला. या पुलाचे वजन 6 हजार किलो होते. चोरट्यांनी आधी हा पूल गॅस कटरने कापला आणि नंतर तो ट्रकमध्ये नेला. बांगूर नगर पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून 4 जणांना अटक केली आहे. हा पूल अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा आहे. मुंबईतील मालाड भागात मागच्या रस्त्यावर एका नाल्याच्या वर ते ठेवण्यात आले होता.

तपासादरम्यान पोलिसांना कळले की ब्रिजला 6 जून रोजी शेवटचे पाहिले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने आरोपीला पकडले. 11 जून रोजी एक मोठा ट्रक पुलाकडे जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून त्याचा माग काढला. तर सत्य उघड झाले आहे. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच चोरीची घटना घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली असून पुलाचा मालही जप्त करण्यात आला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close