हटके

येथे एक मिळेना आणि पठ्ठ्याला चार चार मिळाल्या 

Spread the love
मुंबई / नवप्रहार डेस्क

               मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी, मुली शिकत असल्याने आणि त्यामुळे त्यांना सरकारी विभागासह खाजगी कंपनीत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे मुलींकडे चॉईस आली आहे. मुलींचे पालक आता विस्तृत विचारसरणी ठेऊन लग्नाचा निर्णय मुलींवर सोडत असल्याने  लग्नाळू मुलांना आता मुली मिल्ने कठीण होऊन बसले आहे. लग्नासाठी इच्छुक मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतात. त्यात ते आपली व्यथा मांडून त्यांना काय अडचण येत आहे हे सांगतात. अश्यातच जर एखाद्या तरुणाला चार चार मुली बायका म्हणून मिळत असेल तर ज्यांना एक मुलगी मिल्ने कठीण होऊन बसले आहे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल हा विचार न केलेलाच बरा .

आजकाल मुलांसाठी मुलगी शोधणं खूप अवघड आहे. एक मुलगीही लग्नासाठी सापडणं अवघड होत आहे. अशातच एका पठ्ठ्यानं एक नाही तर चार मुलींसोबत लग्नगाठ बांधली. या मुलाच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. मुलाचा स्वॅग आणि चार बायकोंचं लक पाहून तुम्हीही चकित व्हाल.

मुलगा चार मुलींसोबत लग्न करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. या लग्नाचं दृश्य पाहून कोणाच्याही भुवया उंचावल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक मुलगा चार मुलींशी सोबतच लग्न करतोय. चारही नववधू एक एक करुन वराला हार घालतात. त्यानंतर वधू वराच्या पाया पडतात. वर खूप आनंदी दिसत असून उत्साहास हात वर करुन आपला आनंद व्यक्त करतो.

actorbrajesh07 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. अनेकांनी एकही मिळत नाही आणि याला चार चार मिळाल्या म्हटलं. तर काहीजण म्हणाले, याचं नशीब चांगलं आहे. अशा निरनिराळ्या कमेंट पहायला मिळत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. लग्न समारंभातील अनेक घटना चर्चेत येत असतात. कधी भांडण, हाणामारी, वधू वरांची मस्ती असे सर्वच प्रकारच्या घटना लोकांचं लक्ष वेधून घेतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close