राज्य/देश

आ. सुनील केदार यांना दुसरा मोठा धक्का 

Spread the love
मुंबई  / नवप्रहार मीडिया 
 
                        आ. सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांच्या सह आणखी सहा लोकांना दोषी ठरवत 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास  आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. आता विधिमंडळाने त्यांची आमदारकी रद्द केल्याने त्यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. 

नागपूर जिल्हा बँकेत 125 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला. सुनील केदार हे तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2001 -02 मध्ये त्यांनी बँकेच्या रकमेतून होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या.

सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. या प्रकरणी केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी सुनील केदार यांना आता 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुनील केदार यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी असल्याने ऑक्सिजन वर ठेवलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close