हटके

बँक बॅलन्स, दुचाकी असणारी महिला भिकारीण 

Spread the love

इंदूर / नवप्रहार मीडिया 

              रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशन , किंवा रेल्वेत फिरून अथवा बस स्टँड आणि गजबजलेल्या परिसरात भीक मागनारे आपण पाहतो. महिला किंवा पुरुष मंडळी एखाद्या लहान मुलाला घेऊन भीक मागते तेव्हा लोक दया दाखवून त्यांना वाटेल तितके पैशे त्यांच्या पात्रात टाकतात. सहसा समाज यांच्या परिस्थितीवर कीव करून त्यांना मदत करते. मागील काळात अशी काही प्रकरणे समोर आली आहेत की भिकाऱ्याचा तिच्या / त्याच्या झोपडीत मृत्यू झाला. पोलिसांनी झोपडीत जाऊन तपासणी केली असता झोपडीत लाखो रुपयांचा नोटा आणि चिल्लर नाणी सापडली. एका महिला भिकारीण ची गोदडी झटकली असतात गोदडीतून पाचशे आणि 1हजारच्या लाखो रुपयांच्या नोटा पडल्या होत्या.इंदूर मध्ये देखील लाखो रुपये कमावणारी महिला सापडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीकमुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंदूरमध्ये ही मोहीम सुरू केली आहे. इंदूर भिकारी मुक्त करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहे. ही पथकं प्रमुख चौक आणि मंदिरांमध्ये तैनात आहेत. याच मोहिमेअंतर्गत 7 फेब्रुवारीला एका महिलेला पकडण्यात आलं. आपल्या मुलीसोबत ती भीक मागत होती.

इंदिरा असं या महिलेचं नाव आहे. ही महिला मूळची राजस्थानमधील कलामंदा गावातील आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या लवकुश चौकात तिला मुलीसह भीक मागताना पकडण्यात आलं. तिला एकूण पाच मुलं आहे. दोन मुलं राजस्थानात त्यांच्या गावात आहे. तर इंदूरमध्ये ती आपला नवरा आणि तीन मुलांसह भीक मागते. जवळपास 8 वर्षांपासून ते भीक मागते आहेत. तिने भीक मागून स्वतः जमवलेले पैसे तिच्य़ाकडेच आहेत. पतीची कमाई पतीकडे आणि मुलांची मुलांकडे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही, महिलेने 7 दिवसांत भीक मागून 19200 रुपये कमावले. अवघ्या 45 दिवसांत तिनं अडीच लाख रुपये कमवले आहेत. गावातील सासू, सासऱ्यांना एक लाख रुपये पाठवले. मुलांच्या नावे 50 हजारांची एफडी काढली. खात्यात 50 हजार रुपये ट्रान्सफर केले आणि खर्चासाठी 50 हजार रुपये ठेवले. धक्कादायक म्हणजे तिच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तिच्या नावावर बाईकही आहे, तिच्या नावावर लायसन्सही आहे. पण बाईक कशी चालवायची हे तिला माहित नाही. त्यामुळे तिला परवाना कसा मिळाला हा प्रश्न आहे. गावात शेती आणि घरंही आहे.

महिलेला जिल्हा न्यायालयात पाठवण्यात आलं आहे. या महिलेच्या मुलीला बाल सर्वेक्षण गृहात दाखल करण्यात आलं असून, तिथं त्यांना शिक्षण दिलं जाणार आहे. समुपदेशन करण्यात येणार असून महिलेवर जेजे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close