क्राइम

मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ अटक

Spread the love
शिंदखेडा / नवप्रहार मीडिया 
                ज्या ठिकाणी भावी पिढी घडवली जाते. आणि ज्या ठिकाणी आयुष्याचे धडे दिले जातात त्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा भ्रष्टाचार बळावला आहे.  शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस या गावातल्या आदिवासी प्रकल्प शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेस लाच घेताना अटक झाल्याने आता तो चर्चेचा विषय बनला आहे.
शिक्षक राजेंद्र चौधरी हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या गटविमा योजनेतील बिल मंजूर करण्यासाठी कोषागार कार्यालयात फाईल पाठविणे आवश्यक होते. शाळेकडून त्याला मंजुरी मिळावी यासाठी ते मुख्याध्यापिकेकडे पाठपुरावा करीत होते. गटविमा योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापिका जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती, त्यावर तडजोड होऊन चार हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
मुख्याध्यापिका जगताप यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या कार्यालय आणि घरी तपासणी केली. एसीबीच्या निरीक्षक रूपाली खांडवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागातील मुख्याध्यापिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे झालेली ही कारवाई आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close