त्याने वापरला नवीन फंडा ; बुधवार पेठेत नेऊन घातला गंडा

बुधवार पेठेत नेऊन काढले फोटो ; व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी
पुणे / नवप्रहार मीडिया
महिलेला स्टेशन वर सोडण्याच्या बहाण्याने बुधवार पेठेत नेऊन आणि त्याठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती विरोधात महिलेच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी संतोष दत्तात्रय पवार (वय-36 रा. वेण्णा चौक, मु.पो. मेढा, ता. जावली, जि. सातारा) आणि चारकोप मार्केट, कांदीवली वेस्ट मुंबई येथे राहणाऱ्या 47 वर्षाच्या महिलेची फेसबुक वरुन मैत्री झाली. त्यांच्यात संभाषण वाढले. आरोपी संतोष पवार याने महिलेला स्क्रॅप च्या व्यवसायात मोठा फायदा असल्याचे सांगून पैशे गुंतवायला सांगितले.
महिलेने त्याला 2 लाख रु. दिले. फिर्यादी या पुण्यात आल्या असता आरोपीने त्यांना पुणे स्टेशन येथे सोडण्याच्या बहाण्याने पुण्यातील बुधवार पेठेत नेले. त्याठिकाणी महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. बुधवार पेठेत काढलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार सन 2018 ते 2021 दरम्यान तसेच जुलै 2022 मध्ये पुण्यातील मामलेदार कचेरी आणि महिलेच्या कांदीवली येथील घरी घडला आहे. आरोपीने यानंतर महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 10 लाख 30 हजार 499 रुपये घेतले.
त्यानंतर आणखी पैशांची मागणी केली असता फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.
त्यावेळी आरोपी संतोष पवार याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरीत नेऊन त्याठिकाणी व्यवसायासाठी पैसे दिले असल्याचे महिलेकडून लिहून नोटरी केली. आरोपीने यानंतर महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 10 लाख 30 हजार 499 रुपये घेतले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी केली असता फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.