शिक्षणाकडून उत्कर्षाकडे घेऊन जाणारा सोहळा
डॉ.सुशांत चिमणकर यांचे प्रतिपादन
भंडारा – / प्रतिनिधी
नजिकच्या अशोक नगर फुलमोगरा येथे २४ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले वार्षिक सामाजिक कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या भीम सैनिकांना अभिवादन करून शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देण्याचे काम याद्वारे केले जाते. हां सोहळा म्हणजेच शिक्षणाकडून उत्कर्षाकडे घेवून जाणारा असल्याचे प्रतिपादन लेखक व आंबेडकरी चळवळीतील नेते डॉ.शुशांत चिमणकर यानी केले.
दि.१३ व १४ जानेवारी असे
दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात मागील २४ वर्षांत बरेच वैविध्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले.
त्यात राज्यघटनेबद्दल समाजात जनजागृती व्हावी म्हणून संविधान दिंडी , शिक्षणची ओढ निर्माण व्हावी करीता विविध विषयांवर आधारीत प्रश्न मंजूषा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण , भजन, कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध नृत्याविष्कार यांचे सादरीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत पुस्तक नोटबूक वितरण, असे विवीध प्रकारचे कार्यक्रम यानिमित्ताने घेतले गेलेत.
पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ज्यात गावातील नागरिकांनी विविध कलाविष्कार सादर केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध यांच्या जीवनावर आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मंजूषा घेण्यात आली.
१४ तारखेला सकाळी भीम रॅली काढण्यात आली ज्यात विविध कला पथक, नृत्य पथक, ढोल पथक यांनी अप्रतिम सादरीकरण केले. संध्याकाळी भव्य भीम मेळाव्याचे उदघाट्न युवा गर्जना प्रतिष्ठानचे नरेंद्र पहाडे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद पी.डब्ल्यू.एस कॉलेज नागपूर येथील प्रा. डॉ.सुशांत चिमनकर यांनी भुषविले. डॉ.प्रविण कांबळे (संपादक निळाई), डॉ. सुनंदा रामटेके (शुअर टेक हॉस्पिटल नागपूर), डॉ. अश्वविर गजभिये (इतिहासकार व लेखक), प्रा. डॉ.संजय घरडे (शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नागपूर) यांनी मार्गदर्शन केले. धम्मपीठावर विशेष उपस्थिती डॉ.विनायक रोडगे (न्यूरालास्टिक) मा. प्रिया पाटील ( क्षेत्रीय कार्यालय कॅनरा बँक नागपूर), प्रा.डॉ. बबन मेश्राम, प्रा. रत्नदीप गणवीर, घोल्लर सर (मुख्याध्यापक, माणिकराव सुखदेव हायस्कुल अशोकनगर), राखडे सर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजनात गावातील सर्व बालक, मुले, मुली, महिला भगिनींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम मेळावा समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. जितेंद्र खोबरागडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर सनम गेडाम व गौतम वालकर यांनी आभार मानले.