हनुमान जयंतीनिमित्त अल्पोहार वाटून केली मतदान जनजागृती
मुंदडा परिवाराचे आयोजन
चांदूर तालुका प्रतिनिधी प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे मधील सामाजिक कार्यकर्ते. तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बंडूभाऊ मुंदडा,व शासकीय कॉन्ट्रॅक्टदार राजू मुंदडा यांनी त्यांच्या आई-वडील स्वर्गवासी पुरुषोत्तम दाजी मुंदडा स्वर्गवासी लिलाबाई मुंदडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ.
हनुमान जयंती निमित्त पावन पर्वावर अल्पोहार वाटप करून दि. 26 एप्रिल ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात मतदान शंभर टक्के झालं पाहिजे.यासाठी जनजागृती करून एक नवा संदेश यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना दिला. उन्हाचे दिवस असल्यामुळे आपण सर्वांनी उन्हाच्या आधी.आपल्या परिवारासह मतदान करून लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले कर्तव्य निभवावे अशी विनंती,यावेळी मुंदडा बंधू यांनी केली.
यावेळी हनुमान जयंती निमित्त अल्पोहार वाटप करून.मतदान जनजागृतीचा संदेश दिला. यावेळी शासकीय कॉन्ट्रॅक्टदार राजू मुंदडा व बंडू मुंदडा,मनीष मुंडा,राजीव पठाण,किशोर गंगन, किशोर गंगन,अशोक नंदेश्वर,सुधीर उके,पत्रकार बंडू आठवले,राजू सराफी, रितेश मुंदडा,अनिल गावंडे,विजय पाटील,तेजस लिखार,कैलास सरदार,शुभम इंगलकर, रोशन वासनिक,हतिक मडावी,गोलू पंधराम,सोमेश्वर मेश्राम ,,भगीरथ जाधव,अमोल दाभणे,सह मित्र परिवार उपस्थित होता.