विदेश

हमास चा हल्ला इस्त्रायल ची स्टेट वॉरची घोषणा 

Spread the love

दक्षिण आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

नवी दिल्ली- नवप्रहार मीडिया

इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते.

         गाझा स्ट्रीप मधून हमसाच्या दहशतवाद्यांनी  इस्त्रायल वर मोठ्या प्रमाणात रॅकेट हल्ला केल्याने इस्त्रायल ने स्टेट ऑफ वॉर ची घोषणा केली आहे. इस्रायलने देशातील दक्षिण आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  अनेक दहशतवादी इस्त्रायलच्या भूमीत शिरले होते. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून स्टेट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आलीये.

 

 

देशाच्या दक्षिणेत आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. लोकांना घराच्या बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाझा स्ट्रिपच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे हमास दहशतवादी संघटना आणि इस्त्रायल लष्करामध्ये संघर्ष होण्याची स्थिती आहे.

आज इस्त्रायलमध्ये धार्मिक सुट्टी होती. पण, सकाळी सकाळीच मोठ्याने भोंगे वाजू लागले. त्यामुळे इस्त्रायली नागरिकांची दिवसाची सुरुवात खराब झाली. हमास दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या काही भागांवर रॉकेट हल्ले केले. त्यामुळे वातावरण तणावाचे बनलंय. हमास ही इस्त्रायलने घोषित केलेली दहशतवादी संघटना आहे. गाझा स्ट्रिपवर या संघटनेचे राज्य चालते. इस्त्रायलचे लष्कर मोठी योजना आखत असल्याचे कळतंय. इस्त्रायलकडून सांगण्यात आलंय की, ‘गाझा स्ट्रिपमध्ये हमास दहशतवादी संस्था कार्यरत आहे. देशावर जे हल्ले झाले त्यासाठी ही संघटनाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील.’ इस्त्रायलचे सैन्य हमास दहशतवाद्यांसोबत तीव्र संघर्ष सुरु करणार आहे.

)

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close