ब्रेकिंग न्यूज

मॉडेल वर कार मध्ये सामूहिक बलात्कार ;  नंतर हॉटेल मध्ये नेऊन घृणीत कृत्य

Spread the love
चीनहाट ( लखनऊ ) / नवप्रहार डेस्क 
                 महिलांवर आणि तरुणींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात अनेक निदर्शने होऊन देखील त्यात कुठलीही घट पाहायला मिळत नाही. उलट दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता युपी मधून मॉडेल वर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित मॉडलने चिनहट पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच हे प्रकरण आहे.
पीडितेने पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. पेशाने मी एक मॉडल असून चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मला बोलवून, माझ्यासोबत हे दुष्कृत्य केलं असं पीडित मॉडेलने म्हटलं आहे. पीडितेने सांगितलं की, विपिन सिंह नावाच्या युवकाबरोबर इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. ती कानपूरवरुन त्याला लखनऊला भेटण्यासाठी गेली होती. आरोपी विपिनने तिला कारमध्ये बसवलं व तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.
आम्ही हॉटेलमध्ये असताना आरोपीचे आणखी तीन मित्र तिथे आले. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनय सिंह, इनाम सिंह आणि विपिन सिंह या तिघांविरोधात सामूहिक बलात्कारासह विविध कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केलाय. पीडित मुलीने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, ती कानपूरची असून मॉडेलिंग करते. आरोपीने तिला फोन करुन एका डायरेक्टरशी भेट घडवण्यासाठी लखनऊला बोलावलं होतं. 28 ऑगस्टला ती चिनहिटच्या मटियारी चौकात पोहोचली
पीडित तरुणी लखनऊ पोहोचली, त्यावेळी विपिन तिची वाट पाहत होता. त्यानंतर विपिन तिला स्कॉर्पियोमधून हॉटेलला घेऊन गेला. हॉटेलमध्ये एका युवकाशी चित्रपटाचा डायरेक्टर म्हणून तिच्याशी ओळख करुन दिली. त्यानंतर सर्व आरोपी तिला सोडण्यासाठी म्हणून एकत्र गाडीत बसले. आरोपींनी रस्त्यात तिला कुठल्यातरी वस्तूचा वास दिला, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. तिघे तिला पुन्हा हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेचे डोळे उघडले, तेव्हा ती हॉटेलच्या रुममध्ये होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close