होळीच्या दिवशी शहरात खेळल्या गेली रक्ताची होळी

प्रतिनिधी /0वाशिम
होळी, पोळा या सणाच्या पाडव्याला खून ,हत्या यासारखे प्रकार आवर्जून घडतात. कारण या दिवशी लोकं यथेच्छ दारू प्राशन करतात. आणि मग आपसात भांडण करतात किंवा मग जुने भांडण उकरून काढतात. त्यामुळे यादिवशी अनेक ठिकाणी रक्तपात घडतो. वाशीम मध्ये देखील होळीच्या दिवशी एका तरुणाने तीन लोकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात तीन लोक जखमी झाले असून एकाची प्रकृती नाजूक आहे.
वाशिमच्या खामगांव जीन परिसरात एक लहान मुलगा खेळत असताना एक तरुण दारूच्या नशेत आला. या लहान मुलाला तरुण मारहाण करू लागला. यानंतर लहान मुलाचे वडील आणि इतर काही जण दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला समजावण्यासाठी गेले, तेव्हा त्याने चाकू काढून थेट त्यांच्यावर हल्ला केला.
दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने चाकूने दोघांचे गळे चिरले तर एकाच्या पाठीवर आणि इतर भागात खोल जखमा केल्या आहेत. या चाकू हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला, पण या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिममध्ये दिवसागणीक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून यावर अंकुश घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.वाशिममध्ये 14 वर्षीय मुलाचं अपहरण
दरम्यान वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत सादुडे या 14 वर्षांच्या मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आहे. बाभुळगावामध्ये रात्री नानमुखाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत सादुडे हा डीजेवर नाचण्यासाठी गेला मात्र त्यानंतर तो घरी परत आला नाही, त्यामुळे कुटुंबाने अनसिंग पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अनिकेतच्या शोधासाठी 9 पथके रवाना केली, तसंच घटनास्थळी डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आलं.
अनिकेतच्या घराबाहेर एका बंद लिफाफ्यात 5 पानी पत्र लिहिलेलं सापडलं, ज्यात 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तसंच पोलिसांना याची माहिती देऊ नका, असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान अनिकेतचं अपहरण झाल्याने गावात भीतीचं वातावरण आहे.