विशाखा,सखी सावित्री व माता पालक संघाची सभा संपन्न*
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गोरडे ग्रुप ऑफ एज्युकेशन अंतर्गत बालशिवाजी इंग्लिश स्कूल अंजनगाव सुर्जी येथे विशाखा समिती, सखी सावित्री समिती, माता पालक संघ गठित करून गोरडे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सेक्रेटरी तसेच प्राचार्य संगीता एस. गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
सभेला विशाखा समितीच्या सदस्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ .वनिताताई घोडे उपस्थित होत्या. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. वर्षां भोंडे, सौ.माधुरी गोमाशे उपस्थित होत्या. तसेच माता पालक संघाच्या सदस्या सौ. तृप्ती हुरबडे, सौ.सीमा घोगले, सौ. अनिताताई रंधे ,सौ .सुचिताताई वानखडे ज्योत्स्ना वाहुरवाघ ,साक्षी पांढरे , सुशीला वानखडे , उपस्थित होत्या. तसेच सखी सावित्री समितीच्या प्रमुख सौ.सुनीताताई मुरकुटे (नगरपरिषद सदस्या) उपस्थित होत्या. तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सभेला सुरुवात करण्यात आली.सभेचे अहवाल वाचन मुख्याध्यापिका कु. अर्चना सोनोने यांनी केले . उपस्थित महिला सदस्यांनी विद्यार्थी सुरक्षा, जेंडर इक्वलिटी, पोस्को कायदा, मोबाईल बंदी इ. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे . असे मत व्यक्त केले.
गोरडे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी सौ. संगीता गोरडे यांनी सभेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षितता व सतर्कते संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले . व यासाठी पालकांचे सुद्धा सहकार्य असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन कु. अर्चना सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सीमा चिमोटे यांनी केले.