सामाजिक

समीर नवाज यांना एमकेसीएल सुपर ऐएलसी ॲक्टीव्हिटी अवार्डने सन्मानित

Spread the love

भंडारा नवप्रहार प्रतिनिधी /  हंसराज 

भंडारा शहरात अनेकांनी केले अभिनंदन

भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील संगणक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समीर नवाज यांना एमकेसीएल सुपर ऐएलसी ॲक्टीव्हिटी परफॉर्मन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा मीना हॉटेल (हल्दिराम) नागपुर रोड, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात एमकेसीएल मुंबईचे जनरल मॅनेजर नटराज कटकधोंड, नागपुर विभागीय समन्वयक शशिकांत देशपांडे, नागपुर रिजनल मॅनेजर दया मॅडम, भंडारा जिल्हा समन्वयक संजय ढवळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

समीर नवाज हे गेल्या २५ वर्षांपासून भंडारा शहरातील समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च दर्जेदार संगणक प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत एमकेसीएलने त्यांना हा सन्मान प्रदान केला आहे.

या अवार्डचे श्रेय त्यांनी विद्यार्थी, पालक, विभांषू तिरपुडे, बुसरा सैय्यद, किर्ती, जिल्हा समन्वयक संजय ढवळे, सभिना अन्सारी, निखिता तोरणकर यांना दिले आहे. त्यांच्या या यशाचे अभिनंदन विलास केजरकर, अविल बोरकर, नरेश बेंदेवार, राहुल मेश्राम, प्रदीप काटेखाये, यशवंत बिरे, राजू सतदेवे, अनिकेत शेंडे, इम्रान खान, पवन वंजारी, प्रदीप अले, मीर सतदेवे व पत्रकार मित्र परिवाराने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close