विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल-ठाणेदार पंकज दाभाडे यांची प्रतिपादन.

धामणगाव रेल्वे :-
तालुक्यातील-मंगरूळ दस्तगीर येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याप्रसंगी संस्थेचे कार्य वाखाण्याजोगी आहे हे सांगतानाच ठाणेदार पंकज दाभाडे यांनी वरील उद्गार काढले.
दरवर्षी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडल्या जातो. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते.
यामध्ये लहान चिमुकल्यांचे अनेक नृत्य नाटिका सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम सनकाळे हे होते. उद्घाटक मंगरूळ चे सरपंच सतीश हजारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार पंकज दाभाडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे, पंचायत समिती माजी उपसभापती माधुरीताई दुधे, उपसरपंच गिरीश सुरोशे, सौ प्रफुल्ला दिनेश आठवले सौ वैशाली ईश्वरदास बागडे सौ उज्वला वानखडे सौ सुषमा अटे सौ पूजा इंगोले प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सौ भाग्यश्री म्हात्रे मुख्याध्यापिका ज्ञानदीप स्कूल यांनी केले. कार्यक्रम माझे यशस्वीतेसाठी सौ प्रीती आंबेडकर ,आरती झोडगे, जयश्री देवगडे, शुभांगी उत्तरमारे ,कु. अंजली पुंडे ,सौ मनीषा शेळके ,रोहिणी आंबटकर, शिवानी भोयर ,वैष्णवी शहाडे या शिक्षिकांनी मोलाचे सहकार्य केले.