हटके

मित्रांच्या पैजेत गेला मित्राचा जीव ; ट्रॅक्टर अंगावर कोसळल्याने मृत्यू 

Spread the love

                    किशोरवयीन आणि तारुण्यात असलेल्या मित्रांसाठी पैज ( शर्यत ) हा काही नवीन विषय नाही. त्यांच्यात कुठल्या न कुठल्या कारणावरून पैज लागते.त्यात जिंकलेल्या मित्रांकडून इतर मित्र पार्टी घेतात. मनोरंजन आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी हा प्रकार असतो. पण कधी कधी जोशात मनुष्य होश खोटात. आणि अश्यावेळी ही शर्यत जीवघेणी बनते. असाच प्रकार लखनौ च्या इटौंजामध्ये घडला आहे.

  लखनऊच्या इटौंजामध्ये दोन मित्रांनी १५ हजार रुपयांसाठी ट्रॅक्टर ओढण्याची पैज लावली, पण ही पैज पूर्ण करण्याच्या नादात एकाच अतिशय वेदनादायक पद्धतीने मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना 22 जून रोजी दुपारच्या वेळेस घडली. एका रिकाम्या शेतात दोन मित्रांमध्ये लागलेली ट्रॅक्टर ओढण्याची पैज पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. नीरज आणि जोगेंद्र नावाचे दोन मित्र आपापल्या ट्रॅक्टरमधून आले. त्यांच्यात १५ हजार रुपयांची पैज लागली होती. यावेळी दोघांनीही आपले ट्रॅक्टर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उभे केले आणि दोन्ही ट्रॅक्टर लोखंडी साखळीने बांधले.

कोण विरुद्ध दिशेने असलेला ट्रॅ्क्टर ओढण्यात यशस्वी होईल, तो १५ हजार रुपये जिंकेल, अशी ही पैज होती. पैज सुरू होताच दोघांनीही ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली पण जोगेंद्रच्या ट्रॅक्टरने नीरजचा ट्रॅक्टर जोरात खेचला, त्यामुळे नीरजचा ट्रॅक्टर समोरच्या दिशेने वर उलटला. यावेळी ट्रॅक्टर नीरजच्या अंगावर उलटला आणि तो त्याखाली दबला गेला.

यानंतर लोकांनी आरडाओरडा करत जोगेंद्रला ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले आणि नीरजचा ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरखाली नीरज अतिशय वाईटरित्या दबला गेला, ज्यामुळे त्याचे शरीर कोणताही हालचाल करेनासे झाले. गावकऱ्यांनी मिळून ट्रॅक्टर सरळ करून नीरजला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लोकांचे म्हणणे आहे की, नीरजला ट्रॅक्टर स्टंटचा शौक होता आणि त्याने यापूर्वीही दोनदा अशीच पैज जिंकली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या परिसरात अशाप्रकारे जीवघेणा स्टंट सुरू असल्याची कल्पना पोलिसांना नव्हती. याप्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, हे प्रकरणाची दखल घेत तपास केला जात आहे, या स्टंटबाजीसाठी पैज लावण्यात आणखी कोणत्या लोकांचा समावेश होता, त्या लोकांची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close