घुईखेड येथे बेडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने भव्य यात्रेचे आयोजन
शिव पुराण कथा व हरिनाम किर्तन सप्ताह सोहळा
चांदुर रेल्वे -(ता. प्र.)-
विदर्भातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र घुईखेड येथे बेंडोजी बाबा संजीवन सोहळ्या निमित्त ह. भ. प. कैलास महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून शनिवार दि 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी शुक्रवार पर्यंत शिव पुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने शनिवारला 10 फेब्रुवारीला बेडोजी महाराज संस्थान घुईखेड येथील मंदिरात तीर्थ कलश स्थापना होणार असून स्थानाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर हे सपत्नीक बेडोजी महाराज यांच्या मूर्तीचे लघुरुद्राभिषेक,विधिवत पूजाअर्चना करणार आहे तर दिनकरराव घुईखेडेकर,शशिकांत चौधरी, नरेश प्रवीणकुमार वाजीर (चव्हाण ) हे सहपरीवार मंदिराच्या सभामंडपात शिवमहापुराण कथेची पूजा व कलश स्थापना करणार व त्याच दिवसापासून शिवपुराण प्रवक्ता ह. भ. प. कैलास महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत शिवमहापुराण कथेचे वाचन होणार आहे.तर रोज सकाळी 5 ते 6 वाजता सामुदायिक प्रार्थना,काकडा आरती, ग्राम सफाई, गावातून प्रभात फेरी काढण्यात येईल यासाठी गुरुदेव सेवा मंडळ व गावांतील नागरिक,विद्यार्थी सकाळी 8 वाजता आरती करतील तर श्री बेंडोजी बाबा ग्रंथाचे पारायण ह भ प निवृत्ती महाराज गोळे हे करतील तसेच मंदिरात आयोजित संजीवन समाधी सप्ताहाच्या निमित्ताने दैनंदिन सायंकाळी ८ ते १० कीर्तनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या असून शनिवारी दि 10 ला ह भ प रामकृष्ण महाराज भागवत,रविवारी दि 11 ला दर्यापूर येथील ह भ प विष्णू महाराज गावंडे, सोमवारी दि 12 ला सांगळूद येथील ह भ प भूषण महाराज गिरी, मंगळवारी दि 13ला आळंदी येथील ह भ प गोपाल महाराज अंबाडकर, दि 14 ला अमरावती येथील ह भ प कार्तिक महाराज इंगोले, दि 15 ला अकोला येथील ह भ प सुषमाताई भानुप्रिय, दि 16 ला बुलढाणा येथील ह भ प योगेश महाराज खवले तर दि 17 ला शनिवारी काल्याचे कीर्तन दु 12 ते 2 या वेळात ह भ प उमेश महाराज जाधव यांचे होईल तर काला वाटप ह भ प गणेश महाराज व रुपमसिंग सूर्यवंशी यांचे हस्ते होईल. तसेच दि 10/2/24 ते 16/2/24 पर्यंत दररोज दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत परिसरातील विविध महिला मंडळीच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होईल. या संपूर्ण कार्यक्रमात बहुसंख्येने सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आव्हान विश्वस्त प्रवीणभाऊ घुईखेडकर,नंदकिशोर काकडे,प्रशांत घुईखेडकर,मुंकुद काकाडे,गजानन किटके,बंडु गिरी,सात्विक घुईखेडकर व सर्व विश्वस्त यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे.
यात्रा महोत्सवात नोंदणी करणार्या दिंडीचा सन्मान
घुईखेड येथील बेडोजी महाराज यात्रा महोत्सवात दिंडी घेऊन येणार्या व नोंदणी करणार्या दिंडीला ईश्वर चिठ्ठी काढुन महाआरती करण्याचा मान व दिंडीत येणाऱ्या जोडप्याला साडीचोळी देऊन संस्था तर्फे सन्मान व सत्कार करण्यात येईल यात्रे दरम्यान दिंडीची नोंदणी संगम तायडे,प्रमोद ढवळे यांच्याकडे करण्याचे आवाहन प्रविण घुईखेडकर यांनी केले आहे.