अवकाळी पावसामुळे पान पिपरी पिकाचे नुकसानीबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री ह्यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन. सादर
काळ्या पिपंरीचा रंग झाला पांढरा
मुख्यमंत्री, पालकमंत्री ह्यांना निवेदन सादर
पे
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
गेल्या चार दिवसा पासून महाराष्ट्र सहीत अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या सततच्या चक्रा मुळे तालुक्यातील पान पिपरी औषधी पीक उत्पादक व कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा संकटात सापडला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पान पिंपरी ह्या औषधी पीकाचे अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात,अतोनात नुकसान झाले
पानपिपरी ह्या औषधी पिकाचे भरवशावरच ह्या भागातील शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालत असतो, झालेल्या नुकसाणीमुळे पानपिपरी उत्पादक शेतकरी हा धास्तावून गेला आहे ह्या पिकाचे झालेल्या नुकसानबाबत
त्वरित सर्वेकशन,पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अंजनगाव सुर्जी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक ३० नोव्हेंबर ला तहसीलदार पुष्पा सोळंके यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यात आले ह्याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदार सौं पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, किसान शहर अध्यक्ष रतन भास्कर, माजी नगरसेवक मनोहर भावे, भाजपा सचिव सुनील माकोडे, शेतकरी आघाडीचे हर्षल पायघन,शंकर पाडूरंगजी रेखाते, अशोक येऊल, , रितेश आवंडकर, नंदकिशोर मुरकुटे, राजेश भोंडे , संजय नाठे, संजय टिपरे, महेंद्र धुळे, घनश्याम पायघन, श्रीराम पायघणं, गजानन रेखाते, निलेश भोंडे, अनिल आवडकर, नंदू सोनटक्के, विजय येऊल, मिलिंद गोतमारे, अशोक येऊल, शंकर येऊल, शंकर अ स्वार , आदी शहरातील पिंपरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.