अंजनगावात शिवपुराण कथावाचन निमित् निघाली भव्य कलश यात्रा….
ठिकठिकाणी कलश यात्रेचे शहरांत स्वागत
अंजनगाव सुजी मनोहर मुरकुटे
दि १६ डिसेंबर पासून अमरावती येथे हनुमानगढी, दस्तूरनगर येथे कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे वाणीतून होणाऱ्या शिवपुराण कथावाचन निमित्त दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शहरातील गणपती नगर येथुन भव्य कलश यात्रा काढण्यात आली. दिनांक
१६ तारखेपासून होणा-या
आंतरराष्ट्रीय कथा वाचक
पंडीत मिश्रा यांचे अमरावती येथे होणारे शिवपुराण कथावाचन
कार्यक्रमाची कलशयात्रा हि
महाकालेश्वर,शिवर, अयोध्या
पुजीत कलशाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून निघणार असून ही कलश यात्रा अंजनगाव सुर्जी शहरातून निघाली ही कलश यात्रा प्रजापती बम्हकुमारी ओम् सेंटर बोराळा रोड येथून निघून गौमाता दूध डेरी,डी पी रोड,विठ्ठल मंदिर,जुना बस स्थानक, ते देवनाथ मठ सुर्जी पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेत असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या तसेच कलश यात्रेत रमेशजी बुंदीले,कमलकांत लाडोळे, डॉ. विलासराव कविटकर, उमेश भोंडे, रवि गोळे, मनोहर मुरकुटे,अरुण माकोडे,अभिषेक पटेल,नीताताई बोचरे, विद्याताई घडेकर, प्रियंकाताई मालठाणे आदी शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे मंगेश कोकाटे, अजय देशमुख, व्हिठ्ठल ढोले, निलेश देशमुख, राहुल रांगोळे, मुकुंद बारड,विक्रम पाठक,लोटिया,पदाधिकारी यांनी कलश यात्रेचे दर्शन घेतले