सामाजिक

5 जून ते 8 जून समता पर्वाचे भव्य आयोजन

Spread the love

संगीत शो इंडियन आयडल चार प्रबोधन सत्र वूमन आयकॉनचा आकर्षक कार्यक्रमविविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

यवतमाळ :
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज घटकात समता दृष्टीत मूल्य रुजावीत आणि भारतीयत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने समता पर्व 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 जून ते 8 जून पर्यंत या प्रबोधन कार्यक्रमाची रेलचल यवतमाळकरांना ऐकायला मिळणार आहे.
दि. 5 जून ला यवतमाळ आयडॉलची प्रथम फेरी संपत्र होणार असून याचे उद्घाटन अनिल रामजी आडे उपाध्यक्ष समतापर्य तसेच प्रमुख अतिथी अभियंता संजय मानकर कार्याध्यक्ष व अॅड. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यासोबत प्रदर्शनीचे उद्घाटन तसेच समतापर्व 2024 च्या उद्घाटकीय सत्राला प्रारंभ महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव उद्योग मंत्रालय मुंबई डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष समतापर्व 2024 चे अध्यक्ष इंजि. दीपक नगराळे तसेच प्रमुख वक्ते प्रा. डॉक्टर लक्ष्मण यादव दिल्ली हे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जय राजू प्रसिद्ध तेलगू गायक तेलंगना आणि आवाज इंडिया टीव्हीचे संपादक अमन कांबळे हे असणार आहे. या परिसंवादाचा विषय 21 वे शतक व भारतीय संविधान। हा ठेवण्यात आला असून या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी वर्धा नरेंद्र फुलडोले यांची उपस्थिती राहणार आहे.
दि. 6 जून ला यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी संपन्न होणार असून यावेळी मूकनायक पत्रकारिता पुरस्कार पत्रकार विशाल सोनटक्के यांना करण्यात येणार आहे. तर दुसरे विचारवेध सत्र पुणे येथील वक्ते सर्वजीत बनसोडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत कर्मचारी युवक व महिला वास्तव्य दशा व दिशा या विषयावर प्रबोधन करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक वानखडे माजी अध्यक्ष समतापर्व हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती नितीन बनसोड कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग हे राहणार आहे. दि. 7 जून ला सायंकाळी 6 वाजता तिसरे समता विचारवेध सत्र संपन्न होणारं आहे. यावेळी दिल्ली येथील प्रमुख वक्त्या डॉ. अर्चना गौतम यांचे परिवर्तन की जडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर और क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले की विचारधाराहो मे बसती है। या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राज्यकर अधिकारी अमरावती प्रज्ञा नरेन्द्र फुलझेले ह्या राहणार आहेत. यावेळी डॉ. अर्चना गौतम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समतापर्व सन्मान पुरस्कार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तथा आंबेडकरी विचारवंत डॉ. लीलाताई भेले यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सोबतच वूमन आयकॉन चां कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माधुरी मडावी मुख्याधिकारी नगरपरिषद दिग्रस यांच्या हस्ते संपत्र होणार आहे. पल्लवी रामटेके, माधुरी वाळके, कल्पना घनमोडे, हर्षा बोडखे इत्यादींनी आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला महिलांची प्रचंड उपस्थिती राहणार आहे.
दि. 8 जून 2024 ला यवतमाळ आयडॉलची अंतिम फेरी संपन्न होणार असून विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी यावर्षी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याची जबाबदारी यवतमाळ आयडॉल – अॅड. रामदास राऊत व जयश्री भगत, वूमन आयकॉन पल्लवी रामटेके, माधुरी वाळके, चित्रकला स्पर्धा जनार्दन मनवर, निबंध स्पर्धा राहुल कोचे, चंद्रकांत वाळके, प्रा. अरुण कांबळे, सामान्य ज्ञान स्पर्धा अॅड. राहुल पाटील, नितेश मेश्राम, युवा समन्वयक- सूरज खोब्रागडे इत्यादींकडे सोपविण्यात आलेली आहे.
या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा समारोपीय कार्यक्रमांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता दीपक नगराळे राहणार असून प्रमुख उपस्थिती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड तसेच आमदार मदन येरावार, माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, अॅड. शिवाजीराव मोघे, इत्यादींची उपस्थिती राहणार आहे. यासोबत मनीष पाटील, महेश सोनेकर, नरेंद्र गद्रे, प्रविण देशमुख, माधुरी आडे, ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे, तारीक लोखंडवाला, नीरज वाघमारे, बाळासाहेब मांगुळकर, विवेक जाधव, श्याम सुंदर टेंभरे, आनंद उमरे, विजय रंगारी, घनश्याम दरणे, राजू चांदेकर, सुनील कडू, डॉ. सलीम चव्हाण, नारायण शिंदे, इत्यादींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ यवतमाळकरांनी घ्यावा असे आवाहन समतापर्वाचे अध्यक्ष अभियंता दीपक नगराळे, सचिव नारायण थूल, कोशाध्यक्ष प्रमोदिनी रामटेके व समतापर्व प्रतिष्ठान कार्यकारीनी, प्रसिद्धी प्रमुख विजय मालखेडे, राहुल वासनिक, महेंद्र देवतळे विवेक वानखडे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close