हटके
हे सगळं करायला हिम्मत लागते न राव .……!
1.5 किमी पर्यंत वाहत गेली कार
गुजरात /नवप्रहार डेस्क
मनुष्यावर जर संकट आले तर तो घाबरतो. त्याला लगेच काय करावे हे सुचत नाही. मुख्य म्हणजे तुम्ही जर पुराच्या पाण्यात अडकले असाल तर मग 33 कोटी देव आठवतात.पण सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एक कपल कार सह पुराच्या पाण्यात अडकले आहे . पाणी कार च्या टपा पर्यंत आहे आणि ते कार च्या टपावर शात चित्ताने बसले आहेत.=
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्यानंतर एक दाम्पत्य कारच्या छतावर चढले. तो व्यक्ती मोबाईलने कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ती महिला बुडालेल्या कारवर शांत बसली आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या कारचा फक्त छताचा भागच दिसत आहे. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून या कपलचा जीव वाचवला
रिपोर्टनुसार, करोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने या दाम्पत्याची कार 1.5 किमीपर्यंत वाहत गेली. अग्निशमन दलाचे अधिकारी कमल पटेल म्हणाले की, एक बोटीसह एक सुरक्षा दल त्याच ठिकाणी प्रवास करत होता. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढू शकलो. व्हिडीओ शेअर करत एका एक्स यूजरने म्हटलं की, “ते खूप शांत आहेत. गुजरातच्या साबरकांठामधून एक सुरक्षा अभियान”.
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजनरे प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘ते एव्हढे बेसावध कसे राहू शकतात’!!!, दुसऱ्या यूजरने म्हटलं, ‘शांतीला सलाम’. पुरात अडकलेल्या सुरेश मेस्त्री यांनी म्हटलं, जेव्हा आम्ही नदी ओलांडत होतो, तेव्हा पुराच्या पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर पाण्याचा प्रवाह इतक वेगवान झाला की, आमची कार जवळपास 1.5 किमीपर्यंत वाहत गेली.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |