क्राइम

तरुणाची हत्या करूनमुंडके कापून मृतदेहा शेजारी ठेवले

Spread the love

 प्रतिनिधी /ठाणे 

                     शहरातील एका हायप्रोफाइल सोसायटीच्या टेरेसवर ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे मुंडके कापून ते मृतदेहा शेजारी ठेवण्यात आले होते. सोमनाथ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाण्यातील एका हायप्रोफाइल सोसायटीत हत्येची घटना समोर आलीय. हत्येनंतर ३५ वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलंय.    सोमनाथ असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय आहे.

सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. त्याच्याच साथीदाराने ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. दरम्याना, हत्येचं कारण समोर आलेलं नाही. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close