अकरा वटवृक्ष लावून साजरी केली वटपौर्णिमा
ब्रह्मकुमारी करणार वृक्षाचे संगोपन
हिवरखेड
बाळासाहेब नेरकर कडून
ब्रह्मकुमारी ओमशांती शाखा हिरपूर ता मूर्तीजापुर जिल्हा अकोला शाखेच्या वतीने वटपौर्णिमेच्या दिवशी 11 विवाहित जोडप्याच्या हस्ते अकरा वटवृक्षाची लागवड करण्यात आली .
ब्रह्माकुमारीच्या ” ग्रीन द अर्थ क्लीन द माईंड ” या प्रोजेक्ट अंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच अनुषंगाने
वटपौर्णिमेचा सण हा वृक्ष संवर्धनाचा सण व्हावा हा संदेश समाजात रूढ व्हावा या उद्देशाने गावातील 11 विवाहित जोडप्याच्या हस्ते 11 वटवृक्षाची लागवड करण्यात आली. त्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी ब्रह्माकुमारी शाखेने घेतलेली आहे. वटपौर्णिमा साजरी करत असताना सर्वांनी वृक्ष लागवड करून इतरांना सुद्धा हा संदेश देण्याचा संकल्प यावेळेस केला. यावेळेस सुनिता विलास नसले, हिरपूर सरपंच प्रिती अमोल गडवे, उपसरपंच काजलताई रवी शिंदे, वैष्णवी सुनील इंगळे , गायत्री विनोद पांडे, ज्योती मनोज ढगे, स्वाती विनोद राजगुरे, अश्विनी देवानंद सोनुले, वैशाली पंकज गुल्हाने, शुभदा सुनील कुलकर्णी यांनी यावेळेस सहभाग घेतला होता. यावेळेस ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास नसले यांनी मानवी जीवनाकरता वृक्षाचे महत्व सांगितले .हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गोपाल हेमने, दिगंबर सरदार, सुयोग वह्रेकर ,ईशांत राजगुरे, गजानन भाई, देवानंदभाई सोनुले, विनोद पांडे, सोपानभाई, विलास वानखडे, प्रविण ढगे यांनी परिश्रम घेतले.