Uncategorized

कापसी कोपरीचा रस्ता खड्डयात की रस्त्यात खड्डे

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

  घाटंजी पासून २५ की मी वर कापसी कोपरी हे गाव आहे.या खेडे गावात साधारण ५०० कुटुंब संख्येची लोक वस्ती या गावात राहतात.ग्रामिण भागातील हे अतीदूर्गम खेडे असल्याने या गावातील लोकांना आपल्या गरजा भागविण्यसाठी घोटी या गावात यावे लागते आणी कार्यालईन कामा करिता घाटंजी या तालुक्याच्या ठिकाणी नेहमी ये जा करावी लागते.कापसी कोपरी ते घोटी या दोन गावातील अंतर कापायचे झाल्यास ४ किमी चा रस्ता म्हणजे चंद्रावरील खाड्या पेक्ष्या कमी नाही. या गावातून मोठ्या प्रमाणात रेती घाटावरून रेतीचे ट्रॅक्टर चालत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली असून रस्तात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळू शकत नाही. या गावातील गरोधर महिला डीलेव्हरी काळात रस्त्याचे परिस्थिती पाहता आधीच माहेरी नेऊन ठेवल्या जातात कारण एंन वेळेवर ने आन करता करता खराब रस्ता मूळे मधातच डिलिव्हरी होण्याचे सांगत येत नाही.ऐवडा खराब रस्ता परिस्थिती आहे.या कडे शासकीय व राजकीय लोकांचे दुर्लक्ष असल्याचे यावरून दिसून येत आहे.येत्या काही दिवसांत जर रस्ता झाला नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याचं पक्षाचा राजकारणी मतदान काळात गावात मतदान मागण्यास येऊ देणार नाही असे गावकऱ्यांनी एकमताने ठरविलल्याच गावकऱ्या कडून कळत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close