सामाजिक

घाटंजी कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती निवड धोक्यात!

Spread the love

आठ संचालकांणी जिल्हा उपनिबंधकाकड केलीे तक्रार.

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

घाटंजी- दि.30 एप्रिल रोजी झालेल्या घाटंजी कृषि.ऊ.बा. समितीच्या निवडणुकीनंतर दि 15 मे रोजी घाटंजी बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पाडली. ही निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्या गेली असल्याची तक्रार आठ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाकडे केली आहे.
सदर समिती च्या नवनिर्वाचित सदस्या मधून पदाधिकारी निवड घेण्या करिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांचे आदेशानुसार श्री एस.व्ही कुडमेथे यांची कृषि उत्पन्न बाजार समिति मधील नवनिर्वाचित सदस्या मधून पदाधिकारी निवड घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . दि.15 मे रोजी पदाधिकारी निवड सभेच्या वेळी सभापति पदा करिता एकूण २ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे पदाधिकारी निवड गुप्त मतदान पद्धतीने घेण्या करिता वरील ८ सदस्यानी प्राधिकृत अधिकारी यांना अर्ज सादर केला होता.परंतु प्राधिकृत अधिकारी यांनी समितीच्या उपविधी मधील तरतूद क्रमांक ४१ ही समितीच्या मासिक सभेबाबत असून ती तरतूद पदाधिकारी निवडी करिता लागू होत नसल्याने सदर अर्ज फेटाळून प्राधिकृत अधिकारी यांनी समितीच्या सभापती/उप सभापती पदाची निवडणूक आवाजी मतदान, हात उंच करून घेण्याचे जाहीर केले व त्यानुसार निवड करण्यात आली.वरील ८ अर्जदारांनी आक्षेप घेतल्या नंतर ही प्राधिकृत अधिकारी यांनी आक्षेप मान्य न करता चुकीच्या पद्धतीने निवड करून निकाल जाहीर केला आहे.पदाधिकारी निवड ही अत्यंत चुकीची व बेकायदेशीर रित्या झालेली असल्याने रद्दबादल ठरविण्यात यावी व कृषि उत्पन्न बाजार समिति च्या उपविधी मधील नियम क्रमांक ३६ (१)नुसार बाजार समितीची सभा बोलविणारी दहा दिवसाची नोटिस प्रत्येक सभासदास देण्यात आली पाहिजे असे नमूद असताना प्राधिकृत अधिकारी यांनी दिनांक ०८ मे रोजीचा आदेश असून दि १५ मे रोजी पदाधिकारी निवड ठेवण्यात आली होती.सचिव ,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्रमांक रासनिप्रा /कक्ष ११/बाजार समिति/ सभापती – उपसभापती/ निवड / १६०३/२०२१ दिनांक २०/०५/२०२१ नुसार स्पष्ट म्हटले आहे की ,सभापती व उपसभापती सभेकरिता प्राधिकृत अधिकारी नियुक्ती करताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सहाय्यक निबंधकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करावी,परंतु सदर आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी एस .व्ही कुडमेथे,सहकार अधिकारी श्रेणी १ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यवतमाळ जिल्ह्या मध्ये एकूण १४ बाजार समिति च्या निवडणूक प्रक्रिया दि २८ व ३० मे रोजी पार पडल्या आहेत. परंतु कृषि उत्पन्न बाजार समिति घाटंजी ची निवडणूक दि ३० एप्रिल रोजी होऊन सुद्धा पदाधिकारी निवड मात्र दिनांक १५ मे रोजी घेण्यात आली आहे. का?.त्यावेळी जिल्ह्यातील इतर कोणत्याही बाजार समितीची पदाधिकारी निवड झालेली नसून इतर सर्व बाजार समितीच्या निवडीच्या नोटिसचा कालावधी १० दिवसाचा आहे परंतु घाटंजी कृषि उत्पन्न बाजार समिति येथे नियम बाह्य रित्या ७ दिवसाचा कालावधी देऊन पदाधिकारी निवड पार पाडण्यात आलेली आहे.कारण का?. असा प्रश्न ८ ही तक्रार कर्ते संचालकाणी उपस्थित केला असून यावरून सदर निवड प्रक्रिया ही राजकीय दबावाखाली वेळे आधी घेण्यात आल्याचे निदर्शनास येते असे तक्रार कर्ते म्हणणे आहे.त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिति ची पदाधिकारी निवड ही अवैध रित्या झाल्याचे दिसून येते त्यामुळे सदर निवड रद्द करून पुन्हा सभा ठेऊन गुप्त मतदान पद्धतीने नियमाचे पालन करून नव्याने निवड घेण्यात यावी .अशी मागणी आठ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांचे कडे केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close