घरकुलसाठी घाटंजीत २५ जुनला जनआक्रोश पुकारण्यात येणार.
घर देता का घर ची आर्त हाक!.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार.
घाटंजी वार्ता- सर्वासाठी हक्काचे घर मिळावे व स्वतः ची जागा नसलेल्या ना जागा मिळावी याकरिता शासनाने योजना आखली तरी मात्र एक अखी पिढी होऊन गेले काहींची २५ ती वर्ष होऊन गेलीत मात्र घरकुल मिळेना. आम्हाला घरकुलसाठी वारंवार संघर्ष करावा लागतो का?. अशांचा घरकुल आक्रोशाची मागणीचे पडसाद घाटंजीत उमटताना दिसत आहे. अतिक्रमण धारकांच्या घरकुल प्रश्न गंभीर बनला आहे.नियमानिकुल अतिक्रमण करणे शासनाचे धोरण आहे मात्र घाटंजी नगर परिषद पदाधिकारी या नियमाला केराची टोपली दाखवत आहे. भुमिअभीलेख विभागाच्या वतीने ही या घरकुलसाठी योजनेला मंजुरी अतांना आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी विनाकारण त्रास दिला जातो. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आले असून या समितीने ७ डिसेंबर २०२२ रोजी घाटंजी न.प. मुख्याधिकारी यांना पत्र दिले त्यामध्ये न.प. क्षेत्रातील अतिक्रमण धारकांच्या घरकुल योजना बाबत निवासी प्रयोजनासाठी नकाशा शिथीलता देऊन ठराव घेऊन पुढील कार्यवाही करण्याची आदेश दिले मात्र या पत्रावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येते आहे. हा प्रस्तावास सहा महिने लोटले तरी मात्र कार्यवाही होणे नाही हे गंभीर बाब आहे.१० हे रोजी ‘नगर रचना’ विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी दिलेल्या त्रुटींची पुर्तता पालिकेने अद्याप पर्यंत केलेली नाही म्हणून पुण्यातली नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात विलंब होत असल्याचे कळते.प्रशासक म्हणून घरकुलसाठी योजनेला लाभार्थी वर्गास योग्य मार्गदर्शन करणे ही गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. या संमधी दिनांक २५ जुनं ला ११ वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असून घाटंजी-घाटी येथील राजीव गांधी चौक येथे वंचित घरकुल धारकांच्या मागण्यांसाठी सर्व लाभार्थी व शोषितांणी एकत्र यावे असे आवाहन संय्यद फिरोज,वसंत मोरे, सुरेश जाधव व जनआक्रोश पुकारण्यात आलेल्या कार्यकर्ते यांणी केले आहे.