या कुटूंबाच्या दुखःमध्ये कोल्हापुर परीक्षेत्रातील पोलीस सहभागी आहेत..पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी.
प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे
ऊरुळी कांचन जि. पुणे येथे भोसले कुटूंबाच्या दुखःमध्ये राज्यातील अधिकारी सहभागी आहोत, तीर्थरूप बाबा आदिवासींचे संत ज्ञानदेव म्हणून हे एक नाव अजंन्म प्रेरणादायी राहिल..ज्या समाज्या कडे कलंकित नजरेने पाहीले जात होते अशा समाजवेवस्स्थेतून तीर्थरूपी बाबा ज्ञानदेव भोसले यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना घडवले व समाजसेवेसाठी देश सेवेसाठी निस्वार्थपणे पाठवले त्यांचा आदर्श राज्यातील प्रत्येकाच्या पुढे राहिल.कोल्हापुर परीक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मच्यारी भोसले कुटूंबाच्या दुखःत सहभागी आहोत
असे मत कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मा.सुनील फुलारी यांनी व्यक्त केले. ते आज ऊरुळी कांचन येथे आदर्श माता शेवराई व भोसले कुटुंबांच्या भेटीसाठी घरी आले होते या वेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक शंकर पाटील,आदर्शमाता शेवराआई व जेष्ट लेखक भास्कर भोसले,आदिवासी समाजसेवक,नामदेव ज्ञानदेव भोसले,पत्रकार.सुनिल भोसले,स्वप्रित भोसले, सुरेखाताई भोसले,शोभा भोसले,गौरी भोसले,
टिळेकर वाडीचे पोलीस पाटिल विजय टिळेकर,भवरापुरचे पोलीस पाटिल चंद्रकांत टिळेकर,शिवाजी ननवरे,व ऊरुळी कांचन,टिळेकर वाडी चे ग्रामस्थ ऊपस्तीत होते.