केन्द्र तथा राज्य कर्मचारी शासकीय ,अशासकीय लोकल.बाँडीज सेवानिवृत्त वेलफेअर संघटना वर्धा, यांचे आमसभा व अधिवेशन संपन्न
प्रतिनिधी/ आर्वी
पेन्शन संघटनेचे अधिवेशन व आमसभा संघटनेचे अध्यक्ष मा.अरविंद. गोरशोट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात श्री नथ्थोबा मारणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पेन्शनर. असोसिएशन पुणे, व.श्री वसंत वाबळे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र. राज्य. पेन्शन असोसिएशन पुणे, कार्यक्रमाचे उदघाटक,श्री मान्यवर श्री पंकज भोयर(आमदार),व्यासपीठावर संघटनेचे पदाधिकारी, वसंतराव उजवणे, प्रेमराजजी.पालिवाल आर्वी, भैय्या साहेब केन्ढे सर ,नरेंद्रचंद्र वालके,शेषराव बिजवार,संघटनेचे अन्य पदाधिकारी, यांच्या उपस्थितत संपन्न झाले, दीपप्रज्वलनानंतर,स्वागत गीत रीता खोडे यांनी सादर केले.
. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. सुरुवातीला दिवगंत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषराव बिजवार. यांनी केले तर अहवाल. वाचन, कोषाध्यक्ष. श्री नरेश चंद्र वालके. यांनी. केले तर.कार्यक्रमाचे. उदघाटन. मान्यवर आमदार पंकज भोयर. वर्धा. यांनी केले.
दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत. विद्यार्थ्यांचा. यथोचित सत्कार करण्यात. आला. तसेच.७५व्या वर्षावरील आजीवन सदस्यांचा सत्कार करण्यात. आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन. मा.वसंत वाबळे. आपल्या भाषणातुन सेवाउपदान केंद्राप्रमाणे.चौदा लाखाऐवजी २०लाख करण्यात यावी, असेही सांगितले. वैद्यकीय. भत्ता दरमहा एक हजार देण्यात यावा,१८महिन्याच्या कोव्हीळ काळातील, महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, अशी मागणी. महाराष्ट्र शासनाने केली. आहेत.
.संस्थेचे अध्यक्ष श्री.मारणे यांनी सांगितले की,पोलीस संघटनेचा प्रश्न, तसेच बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे प्रश्न, नगर पालिकेचे प्रश्न, सोडवण्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येईल. संघटनेचे अध्यक्ष श्री गोरशोट्टीवार यांनी कार्यकारिणी च्या. निवडणूक बाबत दिनांक.१३/३/२०२५ते दिनांक-१३/३/२०३०पर्यंत मान्यवर. सहाय्यक धर्मादाय आयुक्त वर्धा यांच्या आदेशानुसार हा प्रस्ताव मांडण्यात आला. आमसभेत एक मताने. निवडणूक करण्याबाबत चे निर्णय घेण्यात आले व तसेच कार्यकारणी ला सर्वच अधिकार दिले. व आमसभेने सर्वानुमते मंजुरी. दिली. कार्यक्रमाचे संचालन श्री शेषराव. बिजवार. यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ,शशिकांत वैद्य यांनी केले. तर.राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.